स्वराज्य ध्वजाचे रत्नागिरीत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:35 AM2021-09-27T04:35:05+5:302021-09-27T04:35:05+5:30
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वराज्य ध्वज यात्रेचे रविवारी दुपारी रत्नागिरीत आगमन झाले. ...
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वराज्य ध्वज यात्रेचे रविवारी दुपारी रत्नागिरीत आगमन झाले. रत्नदुर्ग किल्ल्यावर या ध्वजाचे स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पूजन केले. यावेळी विविध घोषणांनी रत्नदुर्ग परिसर दुमदुमला हाेता.
ही ध्वज यात्रा कर्जतहून सुरू झाली असून, देशातील सहा राज्यांमधून १२,००० किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमध्ये जाणार असून, या दरम्यान विविध धार्मिक, आध्यात्मिक स्थळे, स्मारके अशा ऊर्जा केंद्रे असलेल्या ७४ ठिकाणी स्वराज्य ध्वजाचे प्रातिनिधिक पूजन केले जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी या यात्रेची सांगता होणार आहे. या ध्वजासोबत नाना घवळी, ऋषिकेश करभाजन, विष्णू यादव, पंकज लोखंडे, संदीप शिंदे, रामदास धूताळ हे सर्वजण या ध्वजासोबत जिल्ह्यांमधून फिरत आहेत.
रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावर या ध्वजाचे आगमन झाल्यानंतर ध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुदेश मयेकर, ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, बशीर मुर्तझा, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष नीलेश भोसले, जिल्हा सरचिटणीस बबलू काेतवडेकर, युवक तालुकाध्यक्ष सिद्धेश शिवलकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जुबेर काझी, राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज शेट्ये, नारायण खाेराटे, विद्यार्थी काॅंग्रेस शहराध्यक्ष साईजित शिवलकर, अभिजित गुरव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.