गोड फसवणूक... रत्नागिरी हापूस सांगून कर्नाटक हापूस ग्राहकांच्या माथी

By मेहरून नाकाडे | Published: April 17, 2023 08:16 PM2023-04-17T20:16:31+5:302023-04-17T20:17:15+5:30

नैसर्गिक मधूर स्वाद व अविट गोडीमुळे हापूसला वाढती मागणी आहे.

Sweet deception... on Karnataka Hapus customers by saying Ratnagiri Hapus | गोड फसवणूक... रत्नागिरी हापूस सांगून कर्नाटक हापूस ग्राहकांच्या माथी

गोड फसवणूक... रत्नागिरी हापूस सांगून कर्नाटक हापूस ग्राहकांच्या माथी

googlenewsNext

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : नैसर्गिक बदलामुळे यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन खालावले आहे. स्थानिक हापूस बाजारात कमी असताना, पर्यटक, मुंबईकरांकडून हापूसला वाढती मागणी आहे. त्यामुळे काही विक्रेते रत्नागिरी हापूस सांगत चक्क ग्राहकांच्या माथी कर्नाटक हापूस मारत आहेत. ग्राहकांना फसवणूक झाल्याचे ऊशिरा लक्षात येत आहे.

नैसर्गिक मधूर स्वाद व अविट गोडीमुळे हापूसला वाढती मागणी आहे. रत्नागिरीतील हापूस कर्नाटकात लागवड करण्यात आल्याने रत्नागिरी हापूसच्या हंगामातच हा हापूस तयार होऊन बाजारात येतो. रंग, आकार, सुगंध यामुळे ग्राहक गोंधळतात. सध्या रत्नागिरी हापूस ८०० ते १००० रूपये डझन दराने विकण्यात येत आहे. तर कर्नाटक हापूस ५५० ते ६५० रूपये डझन दराने विकला जात आहे. मात्र कर्नाटक हापूस असा न भासविता चक्क रत्नागिरी हापूस सांगत विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना सुरूवातीला दर रत्नागिरी हापूसचे सांगितले जातात. ग्राहक व विक्रेता यांच्यात दरावरून घासघीस सुरू होते. दर कमी करून हापूस पाहिजे तेवढा बाॅक्समध्ये पॅकींग केला जातो. ग्राहकांना दर कमी केल्याचा आनंद वेगळाच असतो. मात्र आपली हापूसमध्ये फसगत झाली असल्याचे आंबा खाल्यानंतरच लक्षात येत आहे.

हापूसची मांडणी अशी केली जाते की रत्नागिरी व कर्नाटक हापूस सहजासहजी ओळखताच येत नाही.
रत्नागिरी हापूसची वैशिष्टये
१) हा हापूस आकाराने गोलाकार असतो

२) साल पातळ असते
३) देठाकडे पिवळसर तर टोकाकडे हिरवट असतो

३) पिकल्यानंतर दोन ते तीन दिवसातच काळे डाग पडू लागतात.
कर्नाटक हापूसची वैशिष्टये
१) हा हापूस उभट असतो

२) साल जाड असते
३) देठाकडे केशरी, लाल रंग तर खाली पिवळसर असतो

४) चार पाच दिवस टिकतो
दरात कमालीचा फरक असल्याने ग्राहकांची हापूस नावे फसगत होत आहे.

Web Title: Sweet deception... on Karnataka Hapus customers by saying Ratnagiri Hapus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.