टेलरिंग व्यवसायाला परवानगी द्यावी : बाबू माेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:24 AM2021-05-30T04:24:54+5:302021-05-30T04:24:54+5:30
देवरुख : मागील अनेक महिन्यांपासून टेलरिंग व्यवसाय बंद असल्याने आमची उपासमार होत आहे. दुकान भाडे, वाढते लाइट बिल, यामुळे ...
देवरुख : मागील अनेक महिन्यांपासून टेलरिंग व्यवसाय बंद असल्याने आमची उपासमार होत आहे. दुकान भाडे, वाढते लाइट बिल, यामुळे मोठे संकट उभे झाले आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संगमेश्वर तालुक्यातील माखजन विभाग टेलरिंग संघटनेचे अध्यक्ष बाबू मोरे यांनी मागणी केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षभरापासून या टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहेत, तसेच या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची रोजीरोटी संपुष्टात आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे वर्षभरापासून कोणतेच सण, उत्सवासह शाळा सुरू न झाल्याने नवीन कपडे शिलाईसाठी कोणीच फिरकले नाही. त्यातच अलीकडे रेडीमेड कपड्यांकडे लोकांचा ओढा वाढल्याने, हा व्यवसाय उतरतीकडे चालला आहे. शासनाने अशा व्यवसाय करणाऱ्या लोकांकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन सामाजिक अंतर राखत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बाबू माेरे यांनी केली आहे.