ताम्हाणे शाळेचा शेतकरी मित्र राज्यस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 08:17 PM2019-01-23T20:17:42+5:302019-01-23T20:18:42+5:30

कोल्हापूर येथे पार पडलेल्या कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदर्शनात संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ताम्हानेच्या ह्यशेतकरी मित्रह्ण या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. ३५० प्रकल्पातून राज्यस्तरावर जाणारा हा ताम्हानेचा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.

Tamhane School Farmer Friends at State Level | ताम्हाणे शाळेचा शेतकरी मित्र राज्यस्तरावर

ताम्हाणे शाळेचा शेतकरी मित्र राज्यस्तरावर

Next
ठळक मुद्देताम्हाणे शाळेचा शेतकरी मित्र राज्यस्तरावरविविधपयोगी उपकरण

देवरूख : कोल्हापूर येथे पार पडलेल्या कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदर्शनात संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ताम्हानेच्या ह्यशेतकरी मित्रह्ण या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. ३५० प्रकल्पातून राज्यस्तरावर जाणारा हा ताम्हानेचा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन स्वा. मा. ग. पाटील आदर्श विद्यानिकेतन, मिणचे हातकणंगले येथे पार पडले. या प्रदर्शनात रत्नागिरी जिल्ह्यातील ६४, कोल्हापूर जिल्ह्यातील २१०, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६ शाळांचे प्रकल्प सादर करण्यात आले होते.

याच प्रदर्शनात ताम्हाने विद्यालयाचे ५ प्रकल्प मांडण्यात आले होते. त्यापैकी आफान अजमेर धामसकर या विद्यार्थ्याने विज्ञान शिक्षक बाबासाहेब खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या ह्यशेतकरी मित्रह्ण या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली. पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शनात हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

विविधपयोगी उपकरण

प्रकल्पात मांडलेल्या लोखंडी दांड्यापासून विविधपयोगी उपकरणाचा उसाचा डोळा काढणे, बिया लागवड करणे, जमिनीतील दगड काढणे, काजू, रातांबे काढणे, उंच झाडावरील लहान फांद्या काढणे, पाला पाचोळा गोळा करणे, शेतातील माती सरळ करणे असे विविध उपयोग दाखविण्यात आले.

Web Title: Tamhane School Farmer Friends at State Level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.