भोस्ते घाटात टँकरचा स्फोट

By admin | Published: August 31, 2014 12:33 AM2014-08-31T00:33:32+5:302014-08-31T00:33:52+5:30

चालकाचा मृत्यू : टॅँकर ज्वालाग्राही पदार्थाचा; दरीत कोसळल्याने दुर्घटना

Tanker blast in Bhosth Ghat | भोस्ते घाटात टँकरचा स्फोट

भोस्ते घाटात टँकरचा स्फोट

Next

खेड : विषारी रसायन अथवा गॅससदृश ज्वालाग्राही पदार्थाने भरलेला टँकर २०० फूट खोल दरीत कोसळून त्याचा स्फोट झाल्याची घटना काल, शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात घडली. अपघातानंतर टँकरला लागलेल्या भीषण आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, त्याचे नाव अद्याप समजू शकले नाही़
दरम्यान, आगीचे वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले, प्रांताधिकारी डॉ. जयकृष्ण फड, तहसीलदार प्रकाश संकपाळ, पोलीस निरीक्षक विकास गावडे, लोटे वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी परब घटनास्थळी दाखल झाले. मनसेचे नेते वैभव खेडेकर, नंदू साळवी, युवासेनेचे निकेतन पाटणे, युवक काँग्रेसचे गौस खतिब, अभिनय महाजन, राजन महाकाळ, बाळा पांचाळ, बाळासाहेब सासणे, आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुघर्टनेमुळे गणेशोत्सवाला जाणाऱ्या गणेशभक्तांना आपापल्या घरी पोहोचण्यास विलंब होत होता़ तब्बल एक तासानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. गणेशोत्सव काळात अवजड वाहनांना बंदी असतानाही हा टँकर महामार्गावरून भोस्ते घाटापर्यंत आलाच कसा? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला़
स्फोटाच्या दणक्याचे खेड शहरात हादरे
४रात्री या टँकरचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीच्या ज्वाळा तेथून पाच किलोमीटरवरील भोस्ते गावामधील जसनाईक मोहल्ला, पाटीलवाडी, बौद्धवाडी, खाडीपट्ट्यात तसेच खेड शहरातील बाजारपेठ, गुजरआळीपर्यंत दिसत होत्या़ स्फोटाच्या आवाजाच्या दणक्याने घराच्या खिडक्या, दरवाजे यांनाही हादरे बसल्याचे भोस्ते आणि खेडमधील काही नागरिकांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या धामधुमीत गणेशभक्त रात्रभर कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी या आगीच्या ज्वाळा पाहिल्या व घटनास्थळी धाव घेतली होती.
४या घटनेची खबर मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलालाही सूचना करण्यात आली. मात्र, नेमक्यावेळी बंंब बंद पडल्याने तो दुर्घटनास्थळी पोेहोचू शकला नाही़ खेड नगरपालिकेचा पाण्याचा टँकर मात्र यावेळी उपयोगी पडला. यामुळे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न लगेच सुरू झाले़ याचवेळी लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले़

Web Title: Tanker blast in Bhosth Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.