भोस्ते घाटात टँकर दरीत कोसळला; चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:28 AM2021-04-19T04:28:04+5:302021-04-19T04:28:04+5:30

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात भरधाव वेगातील टँकर सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. ...

The tanker crashed into a ravine in Bhoste Ghat; Driver injured | भोस्ते घाटात टँकर दरीत कोसळला; चालक जखमी

भोस्ते घाटात टँकर दरीत कोसळला; चालक जखमी

Next

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात भरधाव वेगातील टँकर सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. चालकाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून तो या जीवघेण्या अपघातातून केवळ जखमी होण्यावर बचावला. हा अपघात शुक्रवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. हा टँकर बेंगलोर येथून महाड औद्योगिक वसाहतीकडे चालला होता.

महामार्ग वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत बोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर चालक चंद्रप्रकाश आनंदकुमार श्रीवास्तव (४१, रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील टँकर (जीजे- ०६, एक्सएक्स ९८७५) हा बेंगलोर येथून घेऊन महाडकडे चालला होता. शुक्रवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास भोस्ते घाट उतरत असताना चालक श्रीवास्तव याचा टँकरवरील ताबा सुटला आणि एका वळणावर रस्त्याच्या कडेचा सुरक्षा कटडा तोडून टँकर सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळला.

अपघाताची खबर मिळताच मृत्युंजय टीमचे कॅप्टन प्रसाद गांधी व त्यांचे सहकारी रोहन इनरकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. टँकरच्या केबिनमध्ये जखमी अवस्थेत अडकून पडलेल्या चालकाला केबिनमधून बाहेर काढून, कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

दरम्यान, कशेडी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत बोडकर, खेड पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, भूषण सावंत, वैशाली अडकुळ यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले.

Web Title: The tanker crashed into a ravine in Bhoste Ghat; Driver injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.