हवामान अन् राजकारणाने कासव महोत्सव बिघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:31 PM2019-03-13T13:31:57+5:302019-03-13T13:33:49+5:30

कासव महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा आल्याने पर्यटक नाराज झाले आहेत. दिनांक ८ मार्चपासून वेळास येथे कासव महोत्सवाला सुरूवात झाली. मात्र, १० मार्चपर्यंत एकही कासवाचे पिल्लू घरट्यांमधून बाहेर न आल्याने कासव महोत्सवासाठी आलेले पर्यटक नाराज झाले आहेत.

Tasav Mahotsav spoiled due to climate and politics | हवामान अन् राजकारणाने कासव महोत्सव बिघडला

हवामान अन् राजकारणाने कासव महोत्सव बिघडला

Next
ठळक मुद्देहवामान अन् राजकारणाने कासव महोत्सव बिघडलाकासव महोत्सवासाठी आलेले पर्यटक नाराज

मंडणगड : कासव महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा आल्याने पर्यटक नाराज झाले आहेत. दिनांक ८ मार्चपासून वेळास येथे कासव महोत्सवाला सुरूवात झाली. मात्र, १० मार्चपर्यंत एकही कासवाचे पिल्लू घरट्यांमधून बाहेर न आल्याने कासव महोत्सवासाठी आलेले पर्यटक नाराज झाले आहेत.

बदलत्या हवामानामुळे नियमित कालावधीमध्ये पिल्लं बाहेर आली नसल्याचे कारण वन विभाग सांगत असला तरी कासव संवर्धनामधील ही मोठी कमतरता म्हणावी लागणार आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपासून वेळास येथे आलिव्ह रिडले या दुर्मीळ कासवांच्या घरट्यांचे संरक्षण केले जात आहे. यावर्षी १३ घरट्यांमधील १५०० अंड्यांचे संरक्षण करण्यात आल्याने त्यातून १५०० पिल्ले बाहेर पडणार आहेत. त्यासाठी दिनांक ८ मार्च ते ६ एप्रिल असा कालावधी निश्चित धरण्यात आला आहे.

यापैकी पहिल्या घरट्यामधून ८ मार्च रोजी कासवांची पिल्ले बाहेर येणार होती. मात्र, तीन दिवस उशिरा म्हणजे सोमवारी ११ मार्च रोजी केवळ ८ पिल्ले बाहेर आली. दरवर्षी कासव महोत्सवाची तारीख देण्याआधी सुरूवातीला एक ते दोन घरट्यांमधून पिल्लं बाहेर आल्याची खात्री केली जाते. त्यानंतरच उर्वरित घरट्यांमधूून पिल्लं बाहेर येण्याचे अनुमान लावले जात होते. यावर्षी मात्र असे न करता प्रत्यक्ष कासव महोत्सवाची तारीख जाहीर करण्यात आली. त्यामुळे वेळास येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक ७ तारखेपासूनच दाखल झाले होते. मात्र, दिनांक १० मार्चपर्यंत एकही कासवाचे पिल्लू वाळूमधून बाहेर न आल्याने पर्यटक नाराज झाले आहेत.

यावर्षी कासव महोत्सवाबरोबरच रॉक क्लायबिंग, झिप लाईन, स्लॅक लाईन, व्हॅली क्रॉसिंग, रायफल शुुटिंग, बरमा ब्रिज, आर्चरी, सुमो फाईट यासारख्या उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. त्याची प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी कासव महोत्सवासाठी मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्यातून मोठ्या आशेने पर्यटक वेळासमध्ये दाखल झाले होते. मात्र, हवामानातील बदलामुळे ना कासवे पाहायला मिळाली व गावातील अंतर्गत वादामुळे अ‍ॅडव्हेंचर गेमही खेळता आले नाहीत. यावर्षी प्रथमच टर्टल टुरिझम सोसायटी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग यांच्यामार्फत या कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Tasav Mahotsav spoiled due to climate and politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.