Tauktae Cyclone: घराचे पत्रे कोसळून नातवावर पडणार, तितक्यात...; देवदूत ठरलेल्या आजोबांनी सांगितला थरार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 01:24 PM2021-05-18T13:24:36+5:302021-05-18T13:25:12+5:30

Tauktae Cyclone: आजोबांचं प्रसंगावधान अन् नातवाला जीवदान; नातवाला वाचवताना आजोबांच्या पाठीला दुखापत

Tauktae Cyclone 70 year old grandfather saves his 5 year old grandson in karle village in ratnagiri | Tauktae Cyclone: घराचे पत्रे कोसळून नातवावर पडणार, तितक्यात...; देवदूत ठरलेल्या आजोबांनी सांगितला थरार 

Tauktae Cyclone: घराचे पत्रे कोसळून नातवावर पडणार, तितक्यात...; देवदूत ठरलेल्या आजोबांनी सांगितला थरार 

Next

रत्नागिरी: तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण पट्ट्यात मोठं नुकसान झालं आहे. गेल्या वर्षी निसर्ग आणि आता तोक्तेमुळे कोकणात कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. तोक्ते वादळानं काल कोकणाला झोडपून काढलं. हे वादळ रत्नागिरी तालुक्यातील कर्ले गावातील कलंबटे कुटुंबीयांसाठी जीवघेणं ठरणार होतं. मात्र कुटुंबातील आजोबांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नातवाचा जीव वाचला. नातवाला वाचवताना आजोबा अशोक कलंबटे यांच्या पाठीला दुखापत झाली. मात्र नातू वाचल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे.

अमृता फडणवीसांचा 'तुफान' शायरीतून सवाल, रुपाली चाकणकरांचा जवाब

तोक्ते चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटातून नातवाचे वाचलेले प्राण या संपूर्ण प्रसंग ७० वर्षीय आजोबा अशोक कलंबटे यांच्या डोळ्यासमोर आहे.  'संध्याकाळी पाच वाजताची वेळ होती. वारा जोरात होता. आम्ही सर्व घरातच होतो. पावसामुळे बाहेर जाणं आम्ही टाळलं. माझा पाच वर्षाचा नातू वेदांत खेळत होता. काही वेळाने मी देवासमोर दिवा लावण्यासाठी देवघरात गेलो. तोच बाहेरुन धडाम असा आवाज आला. घरासमोरील मोठं झाड आमच्या घरावर पडलं होतं. घराचे पत्रे फुटत होते. माझे डोळे वेदांतला शोधत होते. तोच वेदांत मला दिसला.' नातवावर कोसळलेलं संकट आजोबा सांगत होते. 

तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला तडाखा, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला खतरा, पाहा PIC

'वरुन पत्रे कोसळत होते. वेदांत पत्रे कोसळत असलेल्या खोलीकडे जात होता. मी त्याला क्षणाचाही विलंब न लावता मागे खेचलं आणि त्याला पोटाखाली धरलं. माझ्या पाठीवर पत्रे पडले. मला मार लागला. पण माझा नातू सुखरुप असल्याचं समाधान होतं. जर मी माझ्या नातवाला खेचलं नसतं तर कोण जाणे काय झालं असतं. आम्हाला या प्रसंगाची कल्पना देखील करवत नाही,' हे सांगताना आजोबांचे डोळे अश्रूंनी भरले होते.

थरारक Video! आतापर्यंत समुद्रात अडकलेल्य़ा 177 कर्मचाऱ्यांची सुटका; इतरांचा शोध सुरु

'चक्रीवादळामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सारा संसार वादळाने हिरावला. आता आम्ही शेजाऱ्यांकडे राहत आहोत. लाखोंचा खर्च आता आम्हाला करायला लागणार आहे. पण, समाधान एकच आमचा नातून सुखरुप आहे,' असं कलंबटे यांनी सांगितलं. कालचा थरारक प्रसंग सांगताना आजोबांचा कंठ दाटून आला, डोळे पाणावले. वादळामुळे झालेलं नुकसान मोठं आहे. मात्र नातू वाचल्याचं समाधान त्याहून कितीतरी पटीनं अधिक असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

पाच वर्षांच्या वेदांतनंदेखील काल झालेला प्रसंग जशाच्या तसा सांगितला. 'मी देवाच्या खोलीत जात होतो. धडाम आवाज आला. मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर झाड घरावर कोसळलं होतं. वरुन घराचे पत्रेदेखील कोसळत होते. तेवढ्यात आजोबांनी मला जोराने ओढत आपल्या पोटाखाली घेतलं. आजोबांच्या पाठीला लागलं. आजीच्या डोक्याला टाके पडले आणि माझ्या हाताला थोडा मार लागला,' असं सांगताना वेदांत आजोबांना जाऊन बिलगला.

Web Title: Tauktae Cyclone 70 year old grandfather saves his 5 year old grandson in karle village in ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.