खवटी येथे तवेराची बसला धडक, ९ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:37 AM2021-09-17T04:37:34+5:302021-09-17T04:37:34+5:30
खेड : नादुरूस्त झालेली बस रस्त्यावर उभी असताना तवेरा कारची तिला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात नऊजण जखमी झाले ...
खेड : नादुरूस्त झालेली बस रस्त्यावर उभी असताना तवेरा कारची तिला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात नऊजण जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई - गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी येथे बुधवार, दि. १५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबई - गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील खवटी येथे बुधवारी दुपारी २ वाजता हाॅटेल सुरूचीजवळ गुहागर ते भांडुप जाणारी बस नादुरुस्त झाल्याने रस्त्यालगत उभी होती. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या तवेरा कारच्या चालकाचा ताबा सुटला व कारने बसला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात कारमधून प्रवास करणारे राखी सुशील कदम, विहान सुशील कदम, सुशील सुरेश कदम, सुरेश नारायण कदम, सुषमा सुरेश कदम (सर्व रा. पालघर), महेश औदुंबर पवार, रश्मी राजेश दळवी, राजेश दळवी, कृष्णा राजेश दुवे (रा. नालासोपारा) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या अपघातप्रकरणी कारचालक सुहास सुरेश कदम (३१, रा. अंबरनाथ) याच्याविरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.