शिक्षक प्रवीण किणे निलंबित, रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून कारवाई; प्रशासनाच्या बदनामीसह विविध कारणांचा ठपका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 02:03 PM2024-10-25T14:03:18+5:302024-10-25T14:03:49+5:30

रत्नागिरी : सोशल मीडियावर शासनाविरोधात नागरिकांना भडकवणे, प्रशासनाला बदनामी करणे, शाळेत सहकारी तसेच व्यवस्थापन समितीमध्ये मतभेद करणे, शाळेचा संगणक ...

Teacher Praveen Kine suspended, action taken by Ratnagiri Zilla Parishad; Blamed for various reasons including discrediting the administration  | शिक्षक प्रवीण किणे निलंबित, रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून कारवाई; प्रशासनाच्या बदनामीसह विविध कारणांचा ठपका 

शिक्षक प्रवीण किणे निलंबित, रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून कारवाई; प्रशासनाच्या बदनामीसह विविध कारणांचा ठपका 

रत्नागिरी : सोशल मीडियावर शासनाविरोधात नागरिकांना भडकवणे, प्रशासनाला बदनामी करणे, शाळेत सहकारी तसेच व्यवस्थापन समितीमध्ये मतभेद करणे, शाळेचा संगणक घरी घेऊन जाणे, पावती पुस्तकावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच नाव छापणे आदी कारणांचा ठपका ठेवत रत्नागिरी तालुक्यातील कशेळी शाळेतील शिक्षक प्रवीण किणे यांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.

कशेळी शाळेतील या पदवीधर शिक्षकाविरोधातजिल्हा परिषदेकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये हा शिक्षक प्रथमदर्शनी दोषी आढळला आहे. यामुळे त्याच्यावर गुरुवारी जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.

शासकीय सेवेत असताना सोशल मीडियावर शासनाच्या विरोधात नागरिकांना भडकवणे, तसेच शासनाची बदनामी करणे, निर्भय बनो या व्हाॅटस्ॲप समूहावर शासनाविरोधात पोस्ट स्वत:च्या मोबाइलवरून केली असल्याचे चौकशी समितीकडील अहवालावरून सिद्ध होत आहे. शाळेतील शिक्षकांचे आपापसातील मतभेदामुळे शैक्षणिक दर्जा खालावत असून, पटसंख्येत अचानक घट दिसून आली.

व्यवस्थापन समितीने दिलेल्या सूचना न पाळणे, ग्रामस्थांना, पालकांना अथवा शाळेतील कोणालाही विश्वासात न घेता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे लकी ड्रॉ कुपन पावती पुस्तक छपाई करून वर्गणी जमा करणे, तसेच शाळेतील शालेय पोषण आहारातील तांदूळ परस्पर घेऊन जाणे, शाळेतील संगणक घेऊन जाणे आदी कारणांचा ठपका ठेवत या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

या शिक्षकाने कर्तव्यात गंभीर स्वरूपाची कसूर करून महाराष्ट्र जिल्हा परिषद (वर्तणूक) नियम १९६७ मधील तरतुदीचा भंग केलेला आहे. यापूर्वीही या शिक्षकाने अशाच प्रकारचे गैरवर्तन केले होते, तरीही त्याच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसून येत नाही. यामुळे जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील भाग २ नियम ३ (१) (अ) मधील तरतुदीनुसार प्रवीण किणे याला जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

या शिक्षकाचे वर्तन शिक्षकीपेशाला अशोभनीय असून त्याने आपल्या कर्तव्यात गंभीर स्वरूपाची कसूर केल्याने कारवाई करण्यात आली आहे. सध्या निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. - कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

Web Title: Teacher Praveen Kine suspended, action taken by Ratnagiri Zilla Parishad; Blamed for various reasons including discrediting the administration 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.