Coronavirus Unlock-थेट शाळेत गेलेला शिक्षकच निघाला कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 02:25 PM2020-12-05T14:25:27+5:302020-12-05T14:32:03+5:30
coronavirus, school, teacher, ratnagirinews रत्नागिरी तालुक्यातील पावस शाळेमध्ये हजर झालेले शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शालेय परिसरात भीतीचे वातावरण आहे. परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकाने कोरोना चाचणी करणे आवश्यक होते.
रत्नागिरी : तालुक्यातील पावस शाळेमध्ये हजर झालेले शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शालेय परिसरात भीतीचे वातावरण आहे. परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकाने कोरोना चाचणी करणे आवश्यक होते. मात्र, ती न करता हे शिक्षक हजर झाले. अध्यापन करताना अचानक तब्येत बिघडल्याने त्यांची कोरोनाची चाचणी केली असता, हे शिक्षक कोरोना संक्रमित असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे.
दरम्यान, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेले शिक्षक बुधवारी शाळेत हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या शिक्षकाने कोरोनाची चाचणी न करताच कामावर रूजू होऊन कोरोना चाचणी केली नसल्याची माहितीही दडवली होती. शासनाच्या आदेशानुसार शाळेत हजर होण्यापूर्वी शिक्षकांनी सक्तीची कोरोना तपासणी करणे आवश्यक आहे. या सूचनेकडे संबंधित शिक्षकांनी दुर्लक्ष केले आहे.
तसेच शाळेत हजर झालेले शिक्षक अध्यापन करत असताना बुधवारी दुपारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना रूग्णालयात नेले असता, कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या संपर्कात आल्याने संबंधित शिक्षक व विद्यार्थ्यांचीही कोरोना तपासणी करण्याचे नियोजन स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाकडून सुरू आहे. असे प्रसंग टाळण्यासाठी शिक्षकांनी शाळेत हजर होण्याआधी तपासणी करण्याचे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.