शिक्षक दिन सोशल मीडियावरच साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:37 AM2021-09-08T04:37:15+5:302021-09-08T04:37:15+5:30
रत्नागिरी : गेले दीड वर्ष कोरोनामुळे शाळा बंद असून, ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. शाळा बंद असल्याने शिक्षक दिनाचा ...
रत्नागिरी : गेले दीड वर्ष कोरोनामुळे शाळा बंद असून, ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. शाळा बंद असल्याने शिक्षक दिनाचा कार्यक्रम शाळांमधून साजरा झाला नाही. त्यामुळे केवळ सोशल मीडियाद्वारे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
कोरोनापूर्वी दरवर्षी शाळा-शाळांमधून शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात येत असे. बहुतांश शाळांमध्ये अध्यापन विद्यार्थी करत असत, इतकेच नव्हे तर शालेय अन्य कामकाजही विद्यार्थी सांभाळत असत. त्यादिवशी शिक्षक केवळ विद्यार्थी अध्यापन कसे करतात, त्याचा आनंद व निरीक्षण करतात. त्यामुळे विद्यार्थीही शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी उत्सुक असत. शिक्षकांना विद्यार्थी, संस्थांकडून भेटवस्तू देऊन सत्कार करतात. संस्थात्मक पातळीवर शिक्षकांचे गुणगाैरव करण्यात येत असले तरी सध्या तरी एक दिवसाचा शिक्षक होण्याच्या आनंदापासून वंचित राहत आहेत.