शिक्षकांची शाबासकी महत्वाची वाटते

By admin | Published: December 31, 2014 10:05 PM2014-12-31T22:05:49+5:302015-01-01T00:16:45+5:30

सदानंद चव्हाण : मान्यवरांचा गौरव, शिक्षक समितीतर्फे प्रकाशन समारंभ

Teacher's maiden feels important | शिक्षकांची शाबासकी महत्वाची वाटते

शिक्षकांची शाबासकी महत्वाची वाटते

Next

चिपळूण : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी चांगली पावले उचलली आहेत. आपण याबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली असून, सभागृहातही आवाज उठविला आहे. सर्व शिक्षक संघटनांनी आपल्या समस्यांसाठी एकत्र प्रयत्न केले तर ते प्रभावी होतील. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतच असतो. पण शिक्षकांनी कौतुकाची पाठीवर मारलेली थाप त्यांच्यासाठी महत्त्वाची असते, असे प्रतिपादन आमदार सदानंद चव्हाण यांनी केले.
चिपळूण येथील पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा, चिपळूणतर्फे रविवारी सकाळी दिनदर्शिका प्रकाशन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ झाला. यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार पंडित होते. आमदार चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, महिला बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, पंचायत समिती सभापती समीक्षा बागवे, उपसभापती सुचिता सुवार, समितीचे जिल्हा सचिव दिलीप महाडिक, कार्याध्यक्ष प्रभाकर खानविलकर, कोषाध्यक्ष अरविंद जाधव, शिक्षण समिती सदस्य सुनील दळवी, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश काजवे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा सदस्य जयरत्न कदम, पतपेढी संचालक विनय घाणेकर, पंचायत समिती सदस्य दीपक वारोसे, सुभाष कदम, शांताराम बागवे उपस्थित होते.
यावेळी तालुकाध्यक्ष मनोज म्हस्के यांनी प्रास्ताविकात समितीच्या कार्याचा आढावा घेतला. सरचिटणीस मिलिंद चव्हाण, कार्याध्यक्ष विलास गमरे, कोषाध्यक्ष अरविंद राणे, उपाध्यक्ष संतोष कदम, समितीचे नेते संतोष सुर्वे आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत तसेच दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जगदीश कांबळे, शिक्षण समिती सदस्य सुनील दळवी यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Teacher's maiden feels important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.