आपत्ती निवारणासाठी चिपळूण पालिकेचे १२० कर्मचाऱ्यांचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:02+5:302021-06-10T04:22:02+5:30

चिपळूण : हवामान खात्याने अतिवृष्टी आणि पुराचा इशारा दिल्यानंतर चिपळूण नगर परिषद प्रशासनही त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहे. ...

A team of 120 employees of Chiplun Municipal Corporation for disaster relief | आपत्ती निवारणासाठी चिपळूण पालिकेचे १२० कर्मचाऱ्यांचे पथक

आपत्ती निवारणासाठी चिपळूण पालिकेचे १२० कर्मचाऱ्यांचे पथक

Next

चिपळूण : हवामान खात्याने अतिवृष्टी आणि पुराचा इशारा दिल्यानंतर चिपळूण नगर परिषद प्रशासनही त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहे. १२० कर्मचाऱ्यांची १४ पथके तयार करण्यात आली असून, लाइफ जॅकेट, बोटी, बोये, दोरखंड, अशा साहित्यासह परिपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. २४ तास नियंत्रण कक्षही सुरू ठेवण्यात येणार आहे.

हवामान खात्याने कोकणात ९ ते १२ जूनदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यातही ११ व १२ रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तसेच पुराचा धोकाही व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी केली आहे. तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडण्याचा नेहमीचा अनुभव लक्षात घेता नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी आपत्ती निवारणाचा आराखडा तयार केला आहे. येथे ५ ऑगस्ट २०१९ मध्ये एकाच दिवशी २२० मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यावेळी आलेल्या समस्या लक्षात घेऊन त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील सर्वाधिक पूरपातळी आणि बाधित होणारी वस्ती, तेथील कुटुंबे याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आपत्ती निवारण यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये पूरपरिस्थितीसाठी ६० कर्मचाऱ्यांची ७ पथके तयार करण्यात आली आहेत, तर साफसफाईसाठी ६० कर्मचाऱ्यांचे ७ पथके तैनात करण्यात आली आहेत. ७ अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांचे एक स्वतंत्र पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय २ बोटी, ३० रबर ट्यूब, ६० बोये, १ जेसीबी, दोरखंड, बॅटरी, २ जनरेटर, २ अग्निशमन बंब, अशी यंत्रसामग्रीदेखील तयार करण्यात आली आहे. पालिकेत आपत्ती निवारण केंद्र सुरू करण्यात आले असून, २४ तास हे केंद्र सुरू राहणार आहे. याठिकाणीदेखील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: A team of 120 employees of Chiplun Municipal Corporation for disaster relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.