कोकणनगर भागातील ५० घरांमध्ये पथकाने केले सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:34+5:302021-05-07T04:33:34+5:30
रत्नागिरी : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत शहरानजीकच्या कोकणनगर येथील नागरी आरोग्य केंद्रात सर्वेक्षण दरम्यान पथकाने गृहभेटी देत नागरिकांची ...
रत्नागिरी : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत शहरानजीकच्या कोकणनगर येथील नागरी आरोग्य केंद्रात सर्वेक्षण दरम्यान पथकाने गृहभेटी देत नागरिकांची तपासणी केली. यावेळी सुमारे ५० घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बबिता कमलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू झाली आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र यांच्या कार्यक्षेत्रात हे अभियान राबविले जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरानजीकच्या नागरी आरोग्य केंद्र कोकणनगर येथे ही मोहीम आयोजित केली होती. या सर्वेक्षण पथकात लसीकरण सनियंत्रक तुषार साळवी, कोकणनगर नागरी आरोग्य केंद्राच्या आशा प्रतिमा शेलार आणि दीक्षा मेढेकर यांचा समावेश होता. या पथकाने सर्वेक्षण दरम्यान ५० घरांना भेट देत सर्व सद्स्यांची तपासणी केली.
यावेळी या नागरिकांचे तापमान तसेच ऑक्सिजन मात्रा तपासण्यात आली. यात संशयित असलेल्या व्यक्तींना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहिमेची मदत होणार आहे.
या बातमीला ६ रोजीच्या शोभना फोल्डरमधील २ क्रमांकाचा फोटो घेणे.
फोटो मजकूर
रत्नागिरी शहरानजीकच्या कोकणनगर नागरी आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात तुषार साळवी, प्रतिमा शेलार, दीक्षा मेढेकर यांच्या पथकाने गृहभेटदरम्यान परिसरातील घरांमधील नागरिकांची तपासणी केली.