Temples in Maharashtra : आजपासून भक्तांसाठी उघडले देवाचे दार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 11:22 AM2021-10-07T11:22:19+5:302021-10-07T11:22:41+5:30
Temples in Maharashtra : कोरोनामुळे ठेवण्यात आलेली प्रार्थना स्थळे बंद
रत्नागिरी : कोरोनामुळे बंद असलेली देवळांची दारे आज घटस्थापनेपासून उघडली. रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरी मंदिरात विश्वस्तांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मंदिर प्रवेशाचा शुभारंभ करण्यात आला.
शासनाने घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे आज गुरुवारी सकाळी ८ वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री दैव भैरी मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे यांच्याहस्ते खुले करण्यात आले. मंदिराच्या पायरीजवळ श्रीफळ वाढवून प्रवेश केला. त्यानंतर धूपाआरती केली व गार्हाण घातले. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी, खजिनदार मन्नू गुरव, अमर विलणकर, जितेंद्र भोंगले, अकी वाटे आणि समस्त ग्रामस्थ परिवार उपस्थित होता.
आजपासून भक्तांसाठी उघडले देवाचे दार#temples#maharashtrapic.twitter.com/hb829COQhz
— Lokmat (@MiLOKMAT) October 7, 2021
मंदिरे खुली केल्याबद्दल मुन्ना सुर्वे यांनी शासनाचे आभार मानले व नागरिकांनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी येताना नियमांचे पालन करुनच यावे असे आवाहनही केले.