लोटे येथे विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:10+5:302021-06-10T04:22:10+5:30
आवाशी : लॉकडाऊन काळातही विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची लोटे (ता. खेड) येथील पेट्रोल पंपात आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत होती. रत्नागिरी ...
आवाशी : लॉकडाऊन काळातही विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची लोटे (ता. खेड) येथील पेट्रोल पंपात आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत होती.
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दि. ३ जूनपासून कडक निर्बंध लावले आहेत. यानुसार केवळ वैद्यकीय सेवांसाठीच बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही अजूनही लोक रस्त्यावर फिरत आहेत. खेड तालुक्यातील लोटे येथे औद्योगिक वसाहत असल्याने व त्यामुळे येथे मिनी बाजारपेठ उपलब्ध असल्याने ग्रामस्थ काही ना काही तरी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडतात. ही बाब लोटे पोलिसांच्या लक्षात आल्याने लोटे पोलीस दूरक्षेत्र व प्राथमिक आरोग्य केंद्र, लोटे यांच्यावतीने लोटे येथील पेट्रोल पंपात बुधवारी सकाळपासून पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.
लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी शेरे, आशासेविका व लोटेचे पोलीसपाटील हळदे यांच्या पथकामार्फत ही मोहीम राबविण्यात आली.