मंडणगडात २२६ जणांची चाचणी, ६ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:03+5:302021-04-18T04:31:03+5:30

मंडणगड : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी मंडणगड नगरपंचायतीत काेराेना चाचणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या शिबिरात २२६ जणांची काेराेना ...

Testing of 226 persons in Mandangad, 6 positive | मंडणगडात २२६ जणांची चाचणी, ६ पाॅझिटिव्ह

मंडणगडात २२६ जणांची चाचणी, ६ पाॅझिटिव्ह

Next

मंडणगड : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी मंडणगड नगरपंचायतीत काेराेना चाचणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या शिबिरात २२६ जणांची काेराेना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर ६ जण पाॅझिटिव्ह आढळले.

मंडणगड नगरपंचायत, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ एप्रिल २०२१पासून मंडणगड नगरपंचायत कार्यालयात बाजारपेठेतील व्यापारी, शहरातील नागरिकांची ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत २२६ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये शहरातील ३ तर तालुक्यातील ३ असे एकूण ६ जण कोरोनाबाधित आढळले. चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची पुढील उपचारांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली. शहरातील नागरिकांची चाचणी करण्याची मागणी असल्याने आरोग्य विभागाकडून १९ व २० एप्रिल रोजी सुध्दा अशाच प्रकारे चाचणीसाठी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

...............................

मंडणगड नगरपंचायतीत आयोजित करण्यात आलेल्या तपासणी शिबिरात नागरिकांची काेराेना चाचणी करण्यात आली.

Web Title: Testing of 226 persons in Mandangad, 6 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.