साखरपा परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:29+5:302021-05-30T04:25:29+5:30
साखरपा : काेराेनाचे रुग्ण वाढत असतानाच विनाकारण बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण काही कमी झालेले नाही़ त्यांना वचक बसण्यासाठी संगमेश्वर ...
साखरपा : काेराेनाचे रुग्ण वाढत असतानाच विनाकारण बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण काही कमी झालेले नाही़ त्यांना वचक बसण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बाजारपेठेत पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली विनाकारण फिरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी २५ नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली़ सुदैवाने काुणीही पाॅझिटिव्ह आढळले नाही
यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. पी़ बी़ अदाते, पर्यवेक्षक वाघमारे, आरोग्यसेविका गुरव कर्मचारी उपस्थित होते. अचानक झालेल्या पोलिसांच्या कारवाईने नागरिकांची धांदल उडाली. यावेळी पोलीस अंमलदार संजय मारळकर, प्रशांत नार्वेकर हे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसणार आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे नागरिकसुद्धा भांबावले होते. त्यामुळे उद्यापासून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनी बाहेर पडू नये अन्यथा अँटिजन चाचणीला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.