वायुदलाच्या विमानावरून खेडमध्ये रंगला श्रेयवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:31 AM2018-06-18T05:31:58+5:302018-06-18T05:31:58+5:30

विमान थेट योगिता डेंटल कॉलेजमध्ये उतरवण्यात आल्याने वैभव खेडेकर यांनी वायुदलाचे विमान चोरीस गेल्याची तक्रार खेड पोलिसांत दाखल केली.

Thanks to the airplane airplane in the village | वायुदलाच्या विमानावरून खेडमध्ये रंगला श्रेयवाद

वायुदलाच्या विमानावरून खेडमध्ये रंगला श्रेयवाद

Next

भोस्ते (रत्नागिरी): खेड तालुक्याला सैनिकी वारसा लाभलेला आहे. शिवतर गावातील दोनशेहून अधिक शूर जवान दुसऱ्या महायुध्दात धारातीर्थी पडले. अशा जवानांच्या शौर्यगाथा आजच्या तरूण पिढीला प्राप्त व्हावी, यासाठी खेडमधील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात विमान बसवण्यासाठी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे विमान थेट योगिता डेंटल कॉलेजमध्ये उतरवण्यात आल्याने वैभव खेडेकर यांनी वायुदलाचे विमान चोरीस गेल्याची तक्रार खेड पोलिसांत दाखल केली. या तक्रारीनंतर खेडमध्ये शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये विमानावरून श्रेयवाद रंगला आहे.
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या स्वीय सहाय्यकाविरोधात तक्रार दाखल होताच सेना पदाधिकाºयांचे धाबे दणाणले आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी पत्रकार परिषद घेऊन ही तक्रार म्हणजे खोडसाळपणा असल्याचे सांगितले. याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन पाटणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, प्रबोधनकार ठाकरे उद्यानात विमानाची प्रतिकृती बसविण्याबाबत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी संरक्षण मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू केला. त्याप्रमाणे केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे यांनी वायूदलाचे विमान उद्यानात बसविण्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदील दिला. संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे हे विमान आहे त्या ठिकाणी सुस्थितीत आहे.
वायूदलाच्या विमानाचे श्रेय घेण्यावरून वाद विकोपाला जाऊन तो अगदी पोलीस स्थानकापर्यंत गेला आहे. विमान चोरीला गेल्याप्रकरणी पर्यावरणमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक योगेश सदावर्ते यांच्याविरोधात खेड पोलिसात तक्रार दाखल करावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्याकडे केल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या दालनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
वायूदलाचे विमान खेडमध्ये यावे, यासाठी कोणी, कोणी प्रयत्न केले हे सर्वश्रूत आहे. यामध्ये नगराध्यक्षांसह, पर्यावरणमंत्री रामदास कदम, अवजडमंत्री अनंत गीते यांनीही प्रयत्न केले आहेत. हे आपणालाही ज्ञात आहे. ज्यांनी ज्यांनी याकामी प्रयत्न केले, त्यांनाही श्रेय द्यावे, असे निकेतन पाटणे म्हणाले.
>सल्ल्याची गरज नाही
सध्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने आचारसंहिता आहे. म्हणूनच विमान बसविण्याच्या कामाला विलंब होत आहे. १ जुलै रोजी संरक्षण मंत्रालयातील अधिकाºयांचे पथक खेडमध्ये दाखल झाल्यानंतर प्रबोधनकार ठाकरे उद्यानात विमान बसविण्याच्या कामाला चालना मिळेल. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय आम्ही घेणारच, त्यासाठी आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, असे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले.

Web Title: Thanks to the airplane airplane in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.