Ratnagiri: कळवंडे धरणाचा भराव पुन्हा खचला, ग्रामस्थ भयभीत; सांडव्यात भराव येण्याची शक्यता

By संदीप बांद्रे | Published: July 27, 2023 06:45 PM2023-07-27T18:45:56+5:302023-07-27T18:50:09+5:30

पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या मुख्य भिंतीला कोणताही धोका नाही, असे सांगून वेळ मारून नेली. अन्..

The construction fell of Kalwande dam in Chiplun, Villagers fear | Ratnagiri: कळवंडे धरणाचा भराव पुन्हा खचला, ग्रामस्थ भयभीत; सांडव्यात भराव येण्याची शक्यता

Ratnagiri: कळवंडे धरणाचा भराव पुन्हा खचला, ग्रामस्थ भयभीत; सांडव्यात भराव येण्याची शक्यता

googlenewsNext

चिपळूण : लघू पाटबंधारे विभागाच्या कळवंडे येथील धरण दुरूस्तीवरून गेले दोन महिने गदारोळ सुरू आहे. पावसाळी अधिवेशनातही आमदार भास्कर जाधव यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करीत धरणदुरूस्तीचे वस्त्रहरण केले होते. त्यातच गुरूवारी या धरणाच्या मुख्य भिंतीवर नव्याने केलेले पिचींग देखील खचले. यामुळे धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. 

सुमारे १.९० दशलक्ष घनमीटर इतकी पाणी साठवण क्षमता असलेल्या कळवंडे धरणाचा १४० मीटर मधील काही भाग खचल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धरणाची पाहणी करून उपाययोजनांवर हालचाली सुरू केल्या आहेत.
 
कळवंडे धरणास गळती लागल्याच्या पार्श्वभूमीवर तिन महिन्यापुर्वी दुरूस्ती करण्यात आली होती. धरणाच्या मुख्य भितींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ५०० मायक्रॉनच्या प्लॅस्टिकचे अच्छादन टाकून त्यावर भराव केला होता. शिवाय भरावावर दगडी पिचींग देखील केले होते. दरम्यान पहिल्याच पावसात केलेला भराव घसरल्याने धरणाच्या मुख्य भिंतीला धोका असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यानुसार काही दिवसांपुर्वीच भर पावसात पुन्हा भराव करून पिचींगचे काम करण्यात आले होते. 

मुख्य भिंतीच्या मध्यभागी दरडी पिचींगवर साध्या प्लॅस्टीकचे अच्छादन केले होते. परंतू ते टिकणार नसल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त करीत याविषयी बैठक देखील बोलावली होती. या बैठकीत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या मुख्य भिंतीला कोणताही धोका नाही, असे सांगून वेळ मारून नेली होती. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्यानंतर काही दिवसातच मुख्य भिंतीचा भराव पुन्हा खचला आहे. 

Web Title: The construction fell of Kalwande dam in Chiplun, Villagers fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.