350th Shivrajyabhishek Sohala 2023: शिवरायांसमोर रत्नागिरीकर नतमस्तक
By अरुण आडिवरेकर | Published: June 2, 2023 04:12 PM2023-06-02T16:12:17+5:302023-06-02T16:12:39+5:30
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे साेहळ्याचे आयाेजन
रत्नागिरी : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी, जय शिवाजी,’ ‘हर हर महादेव’ असा जयघाेष करत ढाेल-ताशांच्या गजरात रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे शिवराज्याभिषेक साेहळा पार पडला. शिवराज्याभिषेक साेहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या या साेहळ्याचे समस्त रत्नागिरीकर शुक्रवारी (२ जून) साक्षीदार बनले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक साेहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे शिवराज्याभिषेक साेहळा पार पडला. रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे या साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. भगवे झेंडे, भगव्या टाेप्या परिधान करून रत्नागिरीतील शिवप्रेमी सकाळी ७ वाजता या साेहळ्यासाठी उपस्थित राहिले हाेते. सकाळी टेंब्ये येथील रुपेश पांचाळ व जान्हवी पांचाळ या दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी शिवरायांची आरती म्हणण्यात आली.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे प्रमुख राकेश नलावडे, समीर सावंत, वैभव पांचाळ, जयदीप साळवी, अमित काटे, निखिल सावंत, अक्षत सावंत, हिंदू जनजागृती समितीचे संजय जाेशी यांच्यासह रत्नागिरीकर उपस्थित हाेते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीची पूजा हाेताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, हिंदू जनजागृती समितीचे संजय जाेशी यांनी मनाेगत व्यक्त केले.