दिव्यांगांनी पर्यटन दिनी घेतला झिपलाईनचा आनंद

By मेहरून नाकाडे | Published: September 28, 2022 02:02 PM2022-09-28T14:02:32+5:302022-09-28T14:02:56+5:30

रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगता येत नाही, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. समुद्रसफर, भटकंती, धाडसी खेळाचा ...

The disabled enjoyed the zipline on the tourism day | दिव्यांगांनी पर्यटन दिनी घेतला झिपलाईनचा आनंद

दिव्यांगांनी पर्यटन दिनी घेतला झिपलाईनचा आनंद

Next

रत्नागिरी : दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगता येत नाही, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. समुद्रसफर, भटकंती, धाडसी खेळाचा आनंदसुद्धा लुटता येत नाही. मात्र, रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्तींसाठी आरे वारे येथे झिपलाईनचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली. यामुळे दिव्यांगांच्या मनातील भीती गेली आणि त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून साऱ्यांचा उत्साह वाढला. यामुळे खऱ्या अर्थाने पर्यटन दिन साजरा केल्याचे समाधान सर्वांना मिळाले.

आरे वारे येथील ओशनफ्लाय झिपलाइने या दिव्यांगांना मोफत झिपलाईनचा आनंद अनुभवायला दिला. रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन (आरएचपी) आणि ओशनफ्लाय झिपलाईन यांच्या सहयोगाने दिव्यांगांनी जागतिक पर्यटन दिन अनोख्या रितीने साजरा केला. आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांना खूप दिवसांपासून आपल्या दिव्यांग बाधवांनाही आरेवारेचा अथांग समुद्र न्याहाळत झिपलाइनची संधी द्यायची होती. अनेक दिवस त्यांच्या मनात हा विचार घोळत होता. मग त्यांनी पर्यटन दिनाचे औचित्य साधून ओशनफ्लाय झिपलाइनच्या गणेश चौघुले यांच्याशी संपर्क साधला. चौघुले यांनी आरएचपीच्या दिव्यांग सदस्यांना मोफत झिपलाइनची सैर घडवली.

आरे वारेच्या एका टेकडीवर बांधलेल्या रोपवेने किनाऱ्यावर पोहचता येते. ओशनफ्लाय झिपलाईनचे गणेश चौगुले यांनी आपला अमुल्य वेळ दिव्यांगांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दिला. त्यांचे सहकारी राजेश मोहिते, सुरज चव्हाण, सुरज मयेकर, विजय शिवलकर, विधी शिवलकर यांनी दिव्यांगांना रोपवेवर चढविणे, उतरविणेसाठी मदत केली. आरएचपी फाउंडेशनचे समीर नाकाडे आणि प्रिया बेर्डे यांच्या सहकार्याने समिधा कुळये (सोलगाव), कल्पना भागण (फुफेरे), आयेशा काझी (पावस), सचिन शिंदे (गणेशगुळे) यांनी झिपलाइनचा आनंद लुटला.

Web Title: The disabled enjoyed the zipline on the tourism day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.