रत्नागिरीत लवकरच साकारणार शिवसृष्टी, जे. जे. स्कूल ऑफ आर्टंचे २० विद्यार्थी गेले सात महिने करतायंत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:48 PM2022-05-20T17:48:25+5:302022-05-20T18:07:28+5:30

२० विद्यार्थी गेले सात महिने हे काम करत आहेत. आता हे काम पूर्णत्वाला येत आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास ४ घोडेस्वार, २ हत्ती, २२ मावळे, ४ तोफा अशी शिवसृष्टी मारुती मंदिरला साकारत आहे.

The equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Maruti Mandir in Ratnagiri city and beautification of the premises is 85 percent complete | रत्नागिरीत लवकरच साकारणार शिवसृष्टी, जे. जे. स्कूल ऑफ आर्टंचे २० विद्यार्थी गेले सात महिने करतायंत काम

रत्नागिरीत लवकरच साकारणार शिवसृष्टी, जे. जे. स्कूल ऑफ आर्टंचे २० विद्यार्थी गेले सात महिने करतायंत काम

googlenewsNext

तन्मय दाते

रत्नागिरी : शहराची प्रमुख ओळख असलेले मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. शहराच्या या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच शिवसृष्टी अवतरणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहराची ओळख असलेल्या ठिकाणांच्या सुशोभीकरणाकडे विशेषत्त्वाने लक्ष दिले आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईतील नामांकित कॉलेज जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वरिष्ठ प्राध्यापकांशी चर्चा केली आणि त्यातून नवनव्या कल्पना साकारल्या. त्यातूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. आता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यालगतचा परिसर सुशोभित केला जात आहे.

मारुती मंदिरलाही जे. जे.चे विद्यार्थीच हे काम करत आहेत. तेथील २० विद्यार्थी गेले सात महिने हे काम करत आहेत. आता हे काम पूर्णत्वाला येत आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास ४ घोडेस्वार, २ हत्ती, २२ मावळे, ४ तोफा अशी शिवसृष्टी मारुती मंदिरला साकारत आहे. मावळ्यांच्या हातात भाला, तुतारी, काठी आहेत. काही मावळे घोड्यावर बसले आहेत.

याच भागात रायगड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग असे चार किल्लेही साकारले जात आहेत. हे सर्व फायबरपासून बनवण्यात आले असून, ते तयार करण्यासाठी ७ ते ८ महिने या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे.

Web Title: The equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Maruti Mandir in Ratnagiri city and beautification of the premises is 85 percent complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.