साई रिसॉर्टप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी देशपांडे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 08:11 AM2023-04-01T08:11:18+5:302023-04-01T08:11:36+5:30

नियम धाब्यावर बसवून  रिसॉर्टला बिनशेती परवानगी दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

The police arrested Jairam Deshpande, a suspected accused in the Sai Resort case. | साई रिसॉर्टप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी देशपांडे अटकेत

साई रिसॉर्टप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी देशपांडे अटकेत

googlenewsNext

दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणातील संशयित आरोपी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना गुरुवारी पोलिसांनी केली अटक केली. न्यायालयाने त्यांना दि. ३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नियम धाब्यावर बसवून  रिसॉर्टला बिनशेती परवानगी दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

अनिल परब यांना १७ पर्यंत दिलासा

अनिल परब यांचे नाव रिसॉर्टशी वारंवार जोडले जात आहे. त्यांच्याविरुद्ध खटलाही दाखल झाला. त्यांनी केलेला पुनर्विलोकन अर्ज उच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर  १७ एप्रिलपर्यंत तपास यंत्रणांनी त्यांना अटक करू नये, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सध्या तरी परब यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: The police arrested Jairam Deshpande, a suspected accused in the Sai Resort case.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.