पोलिसांनी सापळा रचून सोनसाखळी चोरांना पकडले, कुंभार्ली घाट तपासणी नाक्यावर घेतले ताब्यात

By संदीप बांद्रे | Published: April 26, 2023 02:58 PM2023-04-26T14:58:30+5:302023-04-26T14:58:54+5:30

चिपळूण : हेराफेरी करुन चौघांनी एका वृध्देची सोन्याची चेन लंपास करण्याची घटना शिरगाव (ता. चिपळूण) येथे घडली. या घटनेनंतर ...

The police laid a trap and caught the gold chain thieves | पोलिसांनी सापळा रचून सोनसाखळी चोरांना पकडले, कुंभार्ली घाट तपासणी नाक्यावर घेतले ताब्यात

पोलिसांनी सापळा रचून सोनसाखळी चोरांना पकडले, कुंभार्ली घाट तपासणी नाक्यावर घेतले ताब्यात

googlenewsNext

चिपळूण : हेराफेरी करुन चौघांनी एका वृध्देची सोन्याची चेन लंपास करण्याची घटना शिरगाव (ता. चिपळूण) येथे घडली. या घटनेनंतर सापळा रचून कुंभार्ली तपासणी नाका येथे त्या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन अंगठ्यांसह तीन चेन असा ऐवज जप्त हस्तगत केला.

याबाबतची फिर्याद मनोहर कासार यांनी दिली आहे. राजेश मदारी, भविष्यनाथ मदारी, धारानाथ मदारी,  जाधवनाथ मदारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हे चौघेजण एका कारमधून शिरगाव येथे आले होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना त्यांनी कासार यांना थांबून शंकर मंदिर कुठे त्याची माहिती विचारली, त्यावेळी त्या चौघांनी कासार यांना जादुगिरी करत त्यांच्याकडे असलेली चेन भागून घेत त्यांच्याशी हेराफेरी करत ही चेन त्यांना न देता निघून गेले.

याबाबत कासारे यांनी  शिरगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घाटमाथ्याला जोडणाऱ्या कुंभार्ली घाट तपासणी नाक्यावर सापळा रचून या आरोपींना कारसह ताब्यात घेतले. त्यावेळी तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन चेन व अंगठी असा ऐवज आढळला.

Web Title: The police laid a trap and caught the gold chain thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.