'तेच ठिकाण अन् तेच मैदान'; एकनाथ शिंदेंची १९ मार्चला खेडमध्ये सभा, टिझर पोस्ट, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 06:01 PM2023-03-17T18:01:25+5:302023-03-17T18:01:36+5:30
या सभेची तयारी देखील शिंदे गटाकडून जोरदार सुरु आहे.
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ५ मार्च रोजी चिपळूनच्या खेडमधील गोळीबार मैदानात जाहीर सभा झाली होती. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व आमदारांवर निशाणा साधला होता. मात्र आता त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची १९ मार्च रोजी सभा होणार आहे. या सभेची तयारी देखील शिंदे गटाकडून जोरदार सुरु आहे.
एकनाथ शिंदेंच्या सभेआधी खेडचे स्थानिक आमदार आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी या सभेची माहिती देत टिझर पोस्ट केला आहे. तसेच या व्हिडिओद्वारे शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार..., असंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील नेते उद्धव ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!!
— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) March 17, 2023
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे शिवसैनिकांची भव्यदिव्य जाहीर सभा..
१९ मार्च २०२३ वेळ सायंकाळी ५ वाजता, गोळीबार मैदान, खेड.#Shivsenapic.twitter.com/y7BCnD577L
उद्धव ठाकरेंनी ज्या गोळीबार मैदानात भा घेतली त्याच गोळीबार गोळीबार मैदानात होणार आहे. सभेला उत्तर देण्यासाठी गोळीबार मैदानातच रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. शिंदे यांच्या जाहीर सभेसाठी गोळीबार मैदानात स्टेज उभारणीला सुरुवात झाली आहे. गोळीबार मैदान हाउसफुल करण्यासाठी शिवसैनिकांची नियोजनाची कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात येत आहे.
शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड येथे सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली. खेड हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला आहे. रामदास कदम यांनी दुसऱ्याचं दिवशी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले. १०० वेळी खेडमध्ये आलात तरी योगेश कदम याला निवडणुकीत पाडू शकणार नाही, असा इशारा दिला होता.