कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावणार

By अरुण आडिवरेकर | Published: June 7, 2023 04:58 PM2023-06-07T16:58:43+5:302023-06-07T16:59:07+5:30

रेल्वे ताशी ४० किलोमीटर वेगाने चालवण्याच्या सूचना

The speed of trains on the Konkan railway line will slow down | कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावणार

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग मंदावणार

googlenewsNext

रत्नागिरी :‌ पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीत लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. पावसाळ्यात ६७३ कर्मचारी चोविस तास पेट्रोलिंग करणार आहेत. तर अतिवृष्टीवेळी रेल्वे ताशी ४० किलोमीटर वेगाने चालवण्याच्या सूचना लोको पायलटसना देण्यात आल्या आहेत.

कोकण रेल्वेने पावसाळा सुरू होण्यापूर्वीची तयारी सुरू केली आहे. रेल्वे मार्गाशेजारील पाणी वाहून जाणार्‍या गटारांची साफसफाई, मार्गावरील विशेष तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात भू-सुरक्षा उपाययोजना केल्यामुळे दगड पडणे, माती घसरण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. गेल्या १० वर्षांत रेल्वे सेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही. रेल्वे गाड्या सुरक्षित चालवण्यासाठी मान्सून पेट्रोलिंग केले जाणार आहे.

पावसाळ्यासाठी ६७३ कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. कटिंग्जच्या ठिकाणी चोवीस तास गस्त आणि वॉचमन तैनात केले जाणार आहेत. तेथे गाड्यांच्या वेगावर निर्बंध ठेवले जातील. 
आपत्कालीन परिस्थितीत जलद हालचाल करण्यासाठी आवश्यक साहित्य सज्ज ठेवण्यात आहे. अतिवृष्टी होत असेल तर ताशी ४० किमी वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा कर्मचार्‍यांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन, दोन्ही लोको पायलट आणि गार्ड्स ऑफ ट्रेन्सना वॉकी-टॉकी सेट दिले आहेत.

कोकण रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर २५ वॅटचे व्हीएचएफ स्टेशन उभारले असून, ते प्रत्येक रेल्वेच्या कर्मचार्‍यांकडील वायरलेसशी जोडले आहेत. अ‍ॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅनमध्येही सॅटेलाईट फोन ठेवलेले आहेत. सिग्नल पावसातही व्यवस्थित दिसावेत म्हणून त्यातील दिवे एलईडीयुक्त बसवण्यात आले आहेत. मान्सूनचे वेळापत्रक १० जून २०२३ पासून ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लागू होणार असल्याची माहिती एका परिपत्रकाद्वारे कोकण रेल्वे जनसंपर्क विभागाचे उपमहाप्रबंधक गिरीश करंदीकर यांनी दिली.

इमर्जन्सी कम्युनिकेशन सॉकेट्स 

कोकण रेल्वे मार्गावर इमर्जन्सी कम्युनिकेशन सॉकेट्स सरासरी १ किमी अंतरावर आहेत. त्याचा उपयोग पेट्रोलमन, वॉचमन, लोको पायलट, गार्ड आणि इतर फील्ड मेंटेनन्स कर्मचार्‍यांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यास उपयुक्त ठरतात.

Web Title: The speed of trains on the Konkan railway line will slow down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.