घरफोडी प्रकरणातील संशयित निघाला सराईत गुन्हेगार

By अरुण आडिवरेकर | Published: February 27, 2024 04:10 PM2024-02-27T16:10:05+5:302024-02-27T16:10:34+5:30

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील घर फोडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या संशयिताच्या शहर पोलिसांनी दोन दिवसांच्या आत मुसक्या आवळल्या. ...

The suspect in the burglary case turned out to be a criminal | घरफोडी प्रकरणातील संशयित निघाला सराईत गुन्हेगार

घरफोडी प्रकरणातील संशयित निघाला सराईत गुन्हेगार

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील घर फोडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या संशयिताच्या शहर पोलिसांनी दोन दिवसांच्या आत मुसक्या आवळल्या. हा संशयित सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी शहर पोलिस स्थानकात सन २०१६ ते २०२० या कालावधीत पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सलमान लियाकत कोतवडेकर उर्फ डॉन (२९, रा. खडप मोहल्ला, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. याबाबत रुक्साना इंतिखाब पठाण (५३, रा. खडप मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली हाेती. त्यानुसार, शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) त्या भाऊ मजगावकर यांच्या घरी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी त्या घरी परतल्या असता त्यांना घरात चोरी होऊन रोख ३ लाख २५ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी शहर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून सोमवारी सकाळी ७:३१ वाजता सलमान काेतवडेकर याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून, ताे सराईत गुन्हेगार असल्याचे पुढे आले आहे. त्याचा आणखी काेणत्या गुन्ह्यात समावेश आहे का, याचा तपास पाेलिस घेत आहेत.

Web Title: The suspect in the burglary case turned out to be a criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.