Ratnagiri: छेड काढणाऱ्या बसवाहकाला तरुणीसह ग्रामस्थांनी चोपले; दापोली येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 05:23 PM2024-10-10T17:23:13+5:302024-10-10T17:23:30+5:30

दापोली : नेहमी छेड काढणाऱ्या बसवाहकाला महाविद्यालयीन तरुणीसह ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिल्याची घटना बुधवारी सकाळी दापोली तालुक्यातील दाभोळ ते ...

The teasing bus conductor was beaten up by the villagers along with the young woman; Incidents in Dapoli Taluka | Ratnagiri: छेड काढणाऱ्या बसवाहकाला तरुणीसह ग्रामस्थांनी चोपले; दापोली येथील घटना

Ratnagiri: छेड काढणाऱ्या बसवाहकाला तरुणीसह ग्रामस्थांनी चोपले; दापोली येथील घटना

दापोली : नेहमी छेड काढणाऱ्या बसवाहकाला महाविद्यालयीन तरुणीसह ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिल्याची घटना बुधवारी सकाळी दापोली तालुक्यातील दाभोळ ते कोळथरे मार्गावर घडली. बसवाहक माझी मेहबूब तांबोळी (मूळ गाव शिंदे गल्ली, रेणापूर, जिल्हा लातूर) हे दापोली आगारात कार्यरत असून त्यांच्याविरोधात दाभोळ पोलिस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे.

दापोली बसस्थानकातील बस पंचनदी येथे जाते. काही महाविद्यालयीन तरुणी त्यातून नेहमी प्रवास करतात. एक तरुणी आघाडी फाटा येथे उतरते. त्यावेळी वाहकाने तिची छेड काढल्याचा प्रकार दोनतीन वेळा घडला आहे. बुधवारी सकाळीही पुन्हा तसाच प्रकार या वाहकाकडून घडल्याने या मुलीने महाविद्यालयाच्या शिपायाला फोन करून सांगितले. त्यामुळे महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, पालक सगळे संतप्त झाले. गावातून पुढे गेलेली बस परत येण्याची वाट पाहत सर्वजण रस्त्यावरच थांबले. ज्यावेळी बस परत आली तेव्हा सर्वांनी बस थांबवून वाहकाला बाहेर खेचले आणि त्याची धुलाई केली. त्या महाविद्यालयीन तरुणीनेही त्याला चपलेनेच प्रसाद दिला.

चार-पाच तरुणींनी पुढे येऊन प्रसाद दिल्यावर वाहकाने घडलेला प्रकार कबूल केला. मात्र तोपर्यंत त्याला ग्रामस्थांनी चांगलेच धुतले. दरम्यान, हा प्रकार कळल्यानंतर दाभोळ सागरी स्थानकाचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या वाहकाला ताब्यात घेतले आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. संतप्त ग्रामस्थांनी या वाहकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: The teasing bus conductor was beaten up by the villagers along with the young woman; Incidents in Dapoli Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.