बापाचा रस्ता आहे का? म्हणत टेम्पो चालकाने एकावर केला चाकूहल्ला, मिरकरवाडा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 06:12 PM2022-02-17T18:12:27+5:302022-02-17T18:17:32+5:30

त्याच्यासोबत असलेला मनोज चौधरी ही टेम्पोच्या धडकेत किरकोळ जखमी झाला

The tempo driver Knife attack at Mirkarwada | बापाचा रस्ता आहे का? म्हणत टेम्पो चालकाने एकावर केला चाकूहल्ला, मिरकरवाडा येथील घटना

बापाचा रस्ता आहे का? म्हणत टेम्पो चालकाने एकावर केला चाकूहल्ला, मिरकरवाडा येथील घटना

Next

रत्नागिरी :  रस्त्यावरुन जाणाऱ्या एकास तुझ्या बापाचा रस्ता आहे का? अशी विचारणा करत शिवीगाळ करुन टेम्पो चालकाने चाकूहल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये पादचारी जखमी झाला. राजेंद्र लक्ष्मण राजबन्सी (वय-२२, रा. मिरकरवाडा जेटी, मूळ नेपाळ) असे या जखमीचे नाव आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरकरवाडा जेटीवर मंगळवारी (दि.१५) ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, राजेंद्र राजबन्सी हा बोटीमध्ये लागणारे जिन्नस आणण्यासाठी रस्त्याने निघाला होता. दरम्यान मागून येणाऱ्या तीनचाकी टेम्पोतील चालकाने राजेंद्र याला तुझ्या बापाचा रस्ता आहे का? अशी विचारणा करत शिवीगाळ केली. त्यानंतर चाकू काढून राजेंद्र वर वार केला. यात राजेंद्र  जखमी झाला. त्याच्यासोबत असलेला मनोज चौधरी ही टेम्पोच्या धडकेत किरकोळ जखमी झाला.

याबाबतची फिर्याद राजेंद्र राजबन्सी याने शहर पोलिसांकडे दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहेत.

Web Title: The tempo driver Knife attack at Mirkarwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.