Sanjay Raut: सिंधुदुर्गात राजकीय हत्यांची परंपरा, संजय राऊतांचे टीकास्त्र
By मनोज मुळ्ये | Published: February 17, 2023 03:44 PM2023-02-17T15:44:29+5:302023-02-17T15:45:07+5:30
श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर यांच्या राजकीय हत्या झाल्या. ते लोण आता रत्नागिरीत
रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय हत्यांची परंपरा आहे. ते लोण आता रत्नागिरी जिल्ह्यातही पोहोचले आहे, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रत्नागिरीत केली. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर यांच्या राजकीय हत्या झाल्या. ते लोण आता रत्नागिरीत आल्याचे दिसत आहे. ही एकच साखळी आहे, असे सांगून त्यांनी सिंधुदुर्गातील राजकीय नेत्यांवर नाव न घेता टीका केली.
पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आज, शुक्रवारी रत्नागिरीत दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेत राऊत यांनी सर्वच तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याचा आरोप केला. वारिशे हत्या प्रकरणातही नीट तपास होईल की नाही, याबाबत आपल्याला शंका असल्याचेही ते म्हणाले.
मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न
खोट्या गुन्ह्याखाली आपल्यालाही तुरुंगात पाठवण्यात आले आणि तेथे आपल्याला मारण्याचा प्रयत्न झाला. योग्य वेळ आल्यानंतर यवार विस्तृत बोलेने, असे सांगत त्यांनी देशात, राज्यात आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती असल्याचा आरोपही यावेळी केला.