डोंगर फोडण्यासाठी बोरवेल कास्टिंगचा वापर, परिसरातील घरांचे नुकसान; कुरधुंडा येथील ग्रामस्थांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

By अरुण आडिवरेकर | Published: April 4, 2023 04:10 PM2023-04-04T16:10:36+5:302023-04-04T16:11:47+5:30

या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात तातडीची बैठक लावून निर्णय देण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले

The use of borewell casting to break the mountain, the villagers of Kurdhunda visited the guardian minister Uday Samant | डोंगर फोडण्यासाठी बोरवेल कास्टिंगचा वापर, परिसरातील घरांचे नुकसान; कुरधुंडा येथील ग्रामस्थांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

डोंगर फोडण्यासाठी बोरवेल कास्टिंगचा वापर, परिसरातील घरांचे नुकसान; कुरधुंडा येथील ग्रामस्थांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

googlenewsNext

रत्नागिरी: राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी महामार्गाला लागून असणारे दगडाचे डोंगर फोडण्यासाठी बोरवेल कास्टिंगचा वापर केला जात आहे. या ब्लास्टिंगमुळे परिसरातील  घरांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांची कुरधुंडा (ता. संगमेश्वर) येथील ग्रामस्थांनी आज, मंगळवारी भेट घेतली. यासंदर्भात मंत्री सामंत यांनी बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले. 

पालकमंत्री सामंत यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी कुरधुंडा येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर ठेकेदारांच्या बेजबादार आणि मनमानी कारभाराविरोधात ताशेरे ओढत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थिती संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

बोरवेल ब्लस्टिंगला परवानगी नसताना  ब्लस्टिंग का करता याचा जाब विचारला? या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात तातडीची बैठक लावून निर्णय देण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.

Web Title: The use of borewell casting to break the mountain, the villagers of Kurdhunda visited the guardian minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.