धावत्या शिवशाही बसचे चाक अचानक निखळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 04:10 PM2022-08-08T16:10:46+5:302022-08-08T16:11:08+5:30
काही अंतरावर असलेल्या परशुराम घाटात हा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती
चिपळूण : धावत्या शिवशाही बसचे अचानक पुढील चाक निखळल्याचा प्रकार काल, रविवारी दुपारी चिपळूण वालोपे नजीक घडला. सुदैवाने बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. या प्रकाराने बसमधील प्रवाशांनी गुहागर आगाराच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.
गुहागर आगाराची शिवशाही बस रविवारी सकाळी ११ वाजता ठाणे येथे जाण्यासाठी गुहागरमधून रवाना झाली. ही बस दुपारी १२.३० च्या सुमाराला चिपळूण - वालोपे येथे आली असता धावत्या बसचा पुढील चाक अचानक निखळले. त्यामुळे बस एका बाजूला झुकली. प्रसंगावधान राखून चालकाने बसमधून उतरुन लगेच प्रवाशांनाही बाहेर काढले. समांतर रस्ता असल्याने बसला कोणताही धोका पोहाेचला नाही. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, काही अंतरावर असलेल्या परशुराम घाटात हा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती काही प्रवाशांनी व्यक्त केली