साडवलीत ट्रकमधील आठ लाखाचा मुद्देमाल चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 03:57 PM2019-02-22T15:57:32+5:302019-02-22T15:58:34+5:30

घराशेजारी उभ्या असलेल्या ट्रकमधील मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना साडवली येथे बुधवारी मध्यरात्री घडली आहे. कोल्हापूर येथून ट्रान्सपोर्टचा माल भरून आलेला ट्रक साडवली येथे उभा केला होता. यातील तब्बल ८ लाख १४ हजार ३८७ रूपये किमतीचा माल चोरीला गेल्याची फिर्याद ट्रकमालक सुभाष जाधव यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली आहे.

Theft in eight trucks in Sadavali | साडवलीत ट्रकमधील आठ लाखाचा मुद्देमाल चोरीस

साडवलीत ट्रकमधील आठ लाखाचा मुद्देमाल चोरीस

googlenewsNext
ठळक मुद्देसाडवलीत ट्रकमधील आठ लाखाचा मुद्देमाल चोरीसचोरीची फिर्याद देवरूख पोलीस ठाण्यात

देवरूख : घराशेजारी उभ्या असलेल्या ट्रकमधील मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना साडवली येथे बुधवारी मध्यरात्री घडली आहे. कोल्हापूर येथून ट्रान्सपोर्टचा माल भरून आलेला ट्रक साडवली येथे उभा केला होता. यातील तब्बल ८ लाख १४ हजार ३८७ रूपये किमतीचा माल चोरीला गेल्याची फिर्याद ट्रकमालक सुभाष जाधव यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली आहे.

सुभाष कृष्णा जाधव ( साडवली ) यांनी आपल्या ७०९ (एमएच- ०४ - सीए- ८७४३) या ट्रकमधून कोल्हापूर येथून ट्रान्सपोर्टचा माल आणला होता. हा माल संगमेश्वर येथे न्यायचा होता. खोबऱ्याची पोती, चहा पावडर, मिरची पावडर, हळद पावडर, कापड बंडल आणि सनमायका, प्लायवूड असा लाखोंचा माल ट्रकमध्ये भरला होता. जाधव बुधवारी रात्री उशीरा कोल्हापुरहून साडवली येथे आल्याने हा माल गुरूवारी सकाळी संगमेश्वर येथे पोहोच करू, असे ठरवून त्यांनी आपला ट्रक आपल्या घराशेजारी उभा करून ठेवला होता.
रात्री ११.३० ते ५.३० या वेळेत चोरट्याने ही गाडी पळवून नेली व आतील ८ लाख १४ हजार ३८७ रूपयांचा ऐवज लंपास केला. अनावधानाने ट्रकची चावी ट्रकला राहिल्याची संधी चोरट्याने साधल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गुरूवारी सकाळी जाधव यांचा मुलगा घराबाहेर आला असता त्याला ट्रक जागेवर दिसला नाही. त्याने ही बाब लगेच वडिलांना सांगितली. यावरून जाधव यांनी गाडीची शोधाशोध सुरू केली. जाधव यांना त्यांच्या एका नातेवाईकाचा फोन आला व त्यांनी तुमचा ट्रक कोसुंबच्या माळावर असल्याचे सांगितले.
जाधव यांनी कोसुंबचा माळ गाठत गाडी असल्याची खात्री केली. यावेळी ट्रकमधील माल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाडीमधील तब्बल ६ लाख ७० हजार रूपये किमतीची खोबºयाची १४९ पोती, ३३ हजार रूपयांची चहा पावडर, मिरची पावडर, हळद पावडर, कापड बंडल, प्लायवूड आणि सनमायका असा १ लाख ११ हजार ३८७ किमतीचा माल चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे नमूद केले आहे.

साखरप्यात नाकाबंदी
चोरीचे स्वरूप लक्षात घेवून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र हे श्वान मागोवा घेण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले. सायंकाळी उशीरापर्यंत चोरट्यांचा मागोवा घेण्याचे काम देवरूख पोलीसांकडून सुरू होते. यासाठी साखरपा येथेही नाकाबंदी करण्यात आली होती

Web Title: Theft in eight trucks in Sadavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.