तीस वर्षांचा पाणीप्रश्न निकाली

By admin | Published: April 6, 2016 10:43 PM2016-04-06T22:43:46+5:302016-04-06T23:32:26+5:30

देवरूख नगरपंचायत : नागरिकांना मिळाला दिलासा

Thirty years of water dispute | तीस वर्षांचा पाणीप्रश्न निकाली

तीस वर्षांचा पाणीप्रश्न निकाली

Next

देवरूख : शहरातील पठारवाडीचा पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर असून तो प्रलंबित होता. अनेक राजकीय लोकप्रतिनिधींनी पाणी योजनेसाठी केवळ आश्वासने दिली. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अखेर नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी नागरिकांना दिलासा देऊन पाणी योजना कार्यान्वित केली. यामुळे वाडीचा ३० वर्षांचा पाणी प्रश्न मार्गी लागला.पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत होते. येथील नागरिकांची मेहनत करण्याची तयारी होती. मात्र, पाणी प्रश्न मार्गी लागावा, अशी त्यांची अपेक्षा होती. ग्रामपंचायतीच्या कारभारानंतर आता नगरपंचायत अस्तित्वात आली तरीही नागरिकांचा अनेक वर्षांचा पाणी प्रश्न तसाच राहिला होता. नगरपंचायतीत सत्ताबदल झाला. यावेळी पुन्हा एकदा नागरिकांनी नगराध्यक्ष नीलेश भुरवणे व उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांची भेट घेऊन पाणी प्रश्न मांडला.
यावेळी तुम्ही लोकसहभाग द्या, यासाठी लागणारी पूरक व्यवस्था नगरपंचायत करील, असे आश्वासन चर्चेत देण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी लोकसहभाग देण्याचे निश्चित केले. चर खणणे, पाईप लाईन फिरवणे, स्टॅण्ड पोस्ट उभारणे ही कामे बघता बघता खेडेकरवाडीतील नागरिकांनी स्वत: पूर्णत्त्वास नेली. नगरपंचायतीनेही आवश्यक साहित्याची उपलब्धता करून दिली.
त्यामुळे ही पाणी योजना काही कालावधीतच पूर्ण झाली. याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी देवरूखचे नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, नगरसेविका मेघा बेर्डे, कुंदन कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्ष भुरवणे म्हणाले की, पाणी हा जीवनावश्यक घटक आहे. याची जाण ठेवून नागरिकांची मेहनत केल्यामुळेच पाणी योजना पूर्ण झाली. (प्रतिनिधी)

आंनदोत्सव साजरा
यावेळी खेडेकरवाडीतील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी आमची कै फियत नुसती ऐकून न घेता आम्हाला सहकार्य केले. यामुळेच ३० वर्षांचा पाणी प्रश्न पूर्णत्त्वास गेला, याचा आनंद झाला आहे. नगरपंचायतीने केलेल्या मदतीबद्दल पदाधिकारी व अधिकारी यांचे नागरिकांनी आभार मानून या कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला.

Web Title: Thirty years of water dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.