‘त्या’ सहा जणांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:38+5:302021-04-03T04:28:38+5:30
खेड : मुंबई - गोवा महामार्गावर रेल्वे स्टेशनजवळ ३१ मार्च रोजी रात्री उशिरा सापळा रचून खवले मांजराच्या ...
खेड : मुंबई - गोवा महामार्गावर रेल्वे स्टेशनजवळ ३१ मार्च रोजी रात्री उशिरा सापळा रचून खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले हाेते. त्या सहा जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठाेठावली आहे.
जिवंत खवले मांजराची तस्करी रोखत चिपळूण, दापोली, खेड वनविभाच्या पथकाने ही कारवाई ३१ मार्च रोजी रात्री उशिरा केली होती. या प्रकरणी अजून काही नावे पुढे येण्याची शक्यता वनविभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. दुर्मीळ असलेल्या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडणार असल्याची माहिती वनाधिकारी वैभव बोराटे यांनी दिली. या प्रकरणी महेश विजय शिंदे (३५, रा. खेड), उद्धव नाना साठे (३८, रा. ठाणे), अंकुश रामचंद्र मोरे (४८, रा. पोफळवणे, ता. दापोली), समीर सुभाष मोरे (२१, रा. पोफळवणे, दापोली), अरुण लक्ष्मण सावंत (५२, रा. ठाणे) व अभिजित भार्गव सागावकर (३२, रा. सुकीवली, ता. खेड) या सहा जणांची न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.