रत्नागिरीत नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात हजारोंचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:51 AM2020-01-07T11:51:48+5:302020-01-07T11:53:47+5:30
रत्नागिरी : नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात विविध समाजातील सुमारे १५ हजार मोर्चकऱ्यांनी उद्यमनगर भागातील चंपक मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय ...
रत्नागिरी : नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात विविध समाजातील सुमारे १५ हजार मोर्चकऱ्यांनी उद्यमनगर भागातील चंपक मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. हा मोर्चा खासदार हुसेन दलवाई तसेच माजी खासदार, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्चाचे नियोजन उत्तमरित्या केल्याने अतिशय शांततेत व शिस्तबद्ध रितीने हा मोर्चा पार पडला.
सी. ए. ए., एनउधमनगर येथील चंपक मैदान ते चर्मालय, गोडबोले स्टाप, मारुती मंदीर, माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आलेल्या अती विराट मोर्चा मध्ये राजापूर, देवरूख, संगमेश्वर, लांजा व रत्नागिरी येथील हिन्दू मुस्लिम बांधव हजारोच्या संख्यने सहभागी झाले होते. खासदार हुसैन दलवाई,माजी खासदार भालचंद्र मुणगेकर,आमदार हुस्नबानु खलिफे, हाफिज नदीम सिद्दीकी, मिलिंद किर, कुमार शेट्ये, बशीर मुतुर्झा, अभिजित हेगशेटये, रझाक काझी, नगरसेवक सुफियान वणू, अलिमियां काझी, बाळा कचरे, तानाजी कुळ्ये, एल. व्ही. पवार आदी हिन्दू मुस्लिम बांधव मोर्चात सहभागी झाले होते.
चंपक मैदान हे मोर्चाचे मुख्य ठिकाण होते. या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व मोर्चेकारी सकाळी ९ च्या सुमारास गोळा होऊ लागले. या ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. त्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी उपस्थित मान्यवर खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार हुस्नबानु खलिफे, हाफीज नदीम सिद्दीकी, बशीर मुर्तुर्झा, नगरसेवक सुफयान वणू आदींनी विचार व्यक्त करताना हुकुमशाही पद्धतीने हा कायदा करणाऱ्या केंद्र सरकारवर तोफ डागली.
हा कायदा संविधानाची गळचेपी करणार असल्याने देशातील बहुसंख्य लोकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा कायदा सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
त्यानंतर हा सर्व जमाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. हा कायदा रद्द करण्यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी ते जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी हे निवदन शिष्टमंडळाकडून स्वीकारले.
अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं