हजारो रुग्णांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:34+5:302021-08-25T04:36:34+5:30
पुरस्कार जाहीर रत्नागिरी : दहावी - बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना एअर ...
पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : दहावी - बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक विधवांना आपले अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज कवितांचा कार्यक्रम
देवरुख : राष्ट्रसेवा दल मातृमंदिरच्या देवरुख शाखेतर्फे दिनांक २५ ऑगस्टरोजी वसंत बापट यांचा काव्यप्रवास, त्यांच्या कविता व गीतांचे सादरीकरण आयोजित केले आहे. यासाठी कवी अरुण म्हात्रे उपस्थित रहाणार आहेत. शिवाजी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
कोरोना तपासणी
दापोली : तालुक्यातील अडखळ येथील मोहल्ल्यामध्ये आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यावेळी १२० जणांनी तपासणी करून घेतली. सरपंच रवींद्र घाग, उपसरपंच रौफ काझी, समाजसेवक जहूर कोंडविलकर, ग्रामपंचायत सदस्य अमीर वाकणकर यांच्या प्रयत्नातून ही तपासणी करण्यात आली.
मंगल सणस यांची निवड
दापोली : कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मंगल सणस, तर उपाध्यक्षपदी शिरीष शिगवण यांची निवड करण्यात आली. दापोलीच्या निबंधक वेदा मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. सणस यांच्या निवडीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.