‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, आमदार राजन साळवींना धमकीचा फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 01:02 PM2022-01-15T13:02:15+5:302022-01-15T13:04:32+5:30

नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेच्या सोबत राहून त्यांनी विरोध दर्शविला आहे.

threatening phone call to MLA Rajan Salvi | ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, आमदार राजन साळवींना धमकीचा फोन

‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, आमदार राजन साळवींना धमकीचा फोन

Next

रत्नागिरी : ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’, असे सांगत राजापूरचे आमदार राजन साळवी यांना धमकी दिल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पालाबाबत विराेधी भूमिका घेतल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबांना मारण्याची धमकी दिल्याचे समाेर आले आहे.

याबाबत आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिनांक १२ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. शहर पोलिसांनी एनसी दाखल करून घेतली आहे. 

आमदार राजन साळवी हे राजापूरचे शिसेनेचे आमदार म्हणून २००९ सालापासून कार्यरत आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेच्या सोबत राहून त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांना १० जानेवारी २०२२ राेजी सायंकाळी ७.३० वाजता ९२६५४४०५७६ या क्रमांकावरुन पहिला फोन आला. 

यावेळी मोबाईलवरुन अज्ञाताने ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’ एवढे बोलून फोन बंद केला. त्यानंतर त्याचदिवशी रात्री ११.१४ वाजता परत फोन करुन ‘रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना नही तो तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे’ अशी धमकी देण्यात आली.

आमदार साळवी यांना व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाेलिसांनी या धमकीची दखल घेऊन एनसी दाखल केली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लवकरच शाेध घेण्यात येईल, असे पाेलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: threatening phone call to MLA Rajan Salvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.