रिफायनरी समर्थकांना ठार मारण्याच्या धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 05:23 PM2020-02-19T17:23:03+5:302020-02-19T17:24:11+5:30

राजापूर तालुक्याच्या विकासाठी आणि बेरोजगार तरूणांच्य हाताला काम मिळावे यासाठी तालुक्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी व आयलॉग पोर्ट प्रकल्पाचे जोरदार समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समर्थकांना धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे.

Threats to Kill Refinery Supporters | रिफायनरी समर्थकांना ठार मारण्याच्या धमक्या

रिफायनरी समर्थकांना ठार मारण्याच्या धमक्या

Next
ठळक मुद्देरिफायनरी समर्थकांना ठार मारण्याच्या धमक्यामहिला जिल्हा परिषद सदस्याची पोलिसांकडे तक्रार

राजापूर : तालुक्याच्या विकासाठी आणि बेरोजगार तरूणांच्य हाताला काम मिळावे यासाठी तालुक्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी व आयलॉग पोर्ट प्रकल्पाचे जोरदार समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समर्थकांना धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे.

या दोन्ही प्रकल्पाचे जाहीरपणे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या सागवे विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांना सागवे भागातील काही पुरूष व महिलांनी एका खासगी वृत्त वाहिनीवर प्रतिक्रिया देताना आपणाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी नाटे पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. प्रकल्पांना विरोध करणाऱ्या एका पुढाऱ्याच्या जीवावर ही काही मंडळी आपल्याला धमकी देत असून यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असून, यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवलकर यांनी केली आहे.

आपण प्रकल्पाचे समर्थन केल्याचा राग मनात धरून सागवे कात्रादेवी गावातील शीतल सीताराम गुरव, वर्षा रवींद्र गुरव, राजश्री राजेंद्र पुरळकर, परशुराम कृष्णा पुजारी व अजय लक्ष्मीकांत राणे यांनी आपल्या विरोधात एका खासगी वृत्त वाहिनीवर भडकावू विधान केले आहे. आपणाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. त्याची चित्रफित सोशल मीडियावर फिरवून आपली बदनामीही केली आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या एका पुढाऱ्याच्या जीवावर ही मंडळी आपणाला अशा धमक्या देत असून, त्यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तर जशास तसे उत्तर देऊ

विकासासाठी प्रकल्पाचे समर्थन करताना सदनशीर व कायदेशीर मार्गाने आपली मागणी शासनापर्यंत पोहचविण्याचा मंदा शिवलकर व आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. प्रकल्पच्या समर्थनाच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र, यावरून कोण अशा प्रकारे धमक्या देण्याचा प्रयत्न करत असेल तर सागवे विभागातील शिवसेनेकडून आम्ही त्याचा जाहीर निषेध करत असल्याचे सागवे विभागप्रमुख राजा काजवे, डॉ. सुनील राणे, विद्याधर राणे, मंगेश मांजरेकर व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जशास तसे उत्तर कशा प्रकारे देतात हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Threats to Kill Refinery Supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.