तोतया अँटी करप्शन विभागाच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:48 PM2021-05-28T16:48:32+5:302021-05-28T16:51:06+5:30

Crimenews Police Ratnagiri : शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले, असे धमकावून दुकानदाराकडून ५ हजार रुपये लुटणाऱ्या तोतया अँटी करप्शन विभागाच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही चिपळूण तालुक्यातील रहिवासी आहेत.

Three arrested for allegedly extorting money | तोतया अँटी करप्शन विभागाच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना अटक

तोतया अँटी करप्शन विभागाच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना अटक

Next
ठळक मुद्देलाचलुचपत विभागाचे अधिकारी सांगून पैसे उकळणाऱ्या तिघांना अटकया टोळक्याने अनेकांना गंडवले

गुहागर : शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले, असे धमकावून दुकानदाराकडून ५ हजार रुपये लुटणाऱ्या तोतया अँटी करप्शन विभागाच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही चिपळूण तालुक्यातील रहिवासी आहेत.

गुहागर तालुक्यातील खाडीपट्टी भागातील वेळणेश्वर, अडूर, बोऱ्या भागात गेल्या दोन दिवसापासून हा प्रकार सुरु होता. तुमचं दुकान अनधिकृतपणे सुरु आहे. तुमच्या दुकानात दारु विकली जाते, शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले? आम्ही अँटी करप्शन ऑफिसकडून आलो आहोत.तुमच्याबाबत काही तक्रारी आल्या आहेत. त्या जर मिटवायच्या असतील तर आम्हाला पैसे द्या, असे सांगत पाच ते दहा हजार रुपये घेत या टोळक्याने अनेकांना गंडवले होते.

पिंपर येथील शेखर दत्तात्रय वळंजू यांचे किरणा मालाचे दुकान आहे. दारू पिण्याचा परवाना असून, दुकानात बियर बाटल्या ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजता ईनोवा गाडी (एमएच ०२, सीबी ४२८२) घेऊन तिघेजण आले. त्यांनी बियर बाटली मागितली.

वळंजू यांनी बाटली देताच आपण लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून कारवाई करणार असल्याचे सांगितले़ उद्या कोर्टात यावे लागेल, असे सांगितले. या प्रकाराने घाबरून माझ्यावर केस करू नका, असे सांगितल्यावर १० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीनंतर त्यांनी ५ हजार रूपये दिले.

या सर्व प्रकारानंतर वळंजू यांना संशय आल्याने त्यांनी गुहागर पोलीस स्थानकात माहिती दिली. त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर गुहागर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतली आहे़. त्यांच्यावर खंडणी मागणे व खोटे अधिकारी असल्याची बतावणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक कदम करत आहेत.

Web Title: Three arrested for allegedly extorting money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.