कोरोनाचे आणखी तीन बळी, मृतांची संख्या ७१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 02:37 PM2020-08-07T14:37:23+5:302020-08-07T14:43:40+5:30
गुरूवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नवे ४८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या २0६४ झाली आहे.
रत्नागिरी : कोरोनाने शुक्रवारी जिल्ह्यात आणखी तिघांचा बळी घेतला असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या आता ७१ झाली आहे. सर्वाधिक बळी रत्नागिरी तालुक्यात गेले आहेत.
दरम्यान गुरूवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नवे ४८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या २0६४ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयात कोरोनामुळे शुक्रवारी आणखी तिघांचा बळी घेतला. राजापूर तालुक्यातील नाटे गावातील ६0 वर्षीय महिला रुग्ण तसेच राजापूर तालुक्यातील पाचल येथील एक महिला रुग्ण आणि राजिवडा, रत्नागिरी येथील एक ६0 वर्षीय पुरुष रुग्ण यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
तालुकानिहाय मृतांची अशी आहे, रत्नागिरी - १९, खेड - ६, गुहागर - २, दापोली - १४, चिपळूण - १३, संगमेश्वर - ७, लांजा - २, राजापूर - ७, मंडणगड - १.
गुरूवारी रात्री उशिराच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ४८ कोरोना रूग्णांची भर पडली आहे. त्यात रत्नागिरी तील १४, कामथे येथल १0, कळंबणी येथील १९, दापोलीतील २ तर देवरूखातील एका रूग्णाचा समावेश आहे.