रत्नागिरी जिल्ह्यातील सालदुरे समुद्र किनारी बैलगाडी शर्यतीचा थरार (व्हिडिओ)

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 01:37 PM2022-04-13T13:37:59+5:302022-04-13T13:38:24+5:30

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अनेक ठिकाणी शर्यतींचा धुरळा उडाला. अशाच शर्यती रत्नागिरी जिल्ह्यातही पार पडल्या मात्र, या शर्यतीमध्ये धुरळा उडाला नाही. कारण या शर्यती कुठ डोंगर माथ्यावर किंवा मैदानावर नाही तर चक्क समुद्र किनारी पार पडल्या.

Thrill of Saldure beach bullock cart race in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यातील सालदुरे समुद्र किनारी बैलगाडी शर्यतीचा थरार (व्हिडिओ)

रत्नागिरी जिल्ह्यातील सालदुरे समुद्र किनारी बैलगाडी शर्यतीचा थरार (व्हिडिओ)

googlenewsNext

शिवाजी गोरे

दापोली : बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अनेक ठिकाणी शर्यतींचा धुरळा उडाला. अशाच शर्यती रत्नागिरी जिल्ह्यातही पार पडल्या मात्र, या शर्यतीमध्ये धुरळा उडाला नाही. कारण या शर्यती कुठ डोंगर माथ्यावर किंवा मैदानावर नाही तर चक्क समुद्र किनारी पार पडल्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील सालदुरे समुद्र किनारी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्यांदाच सालदुरे समुद्र किनार्‍यावर सीमाता देवी मंडळाने या शर्यतीचे आयोजन केले होते. हरणे, असुद, मुरुड, लाडघर, आंजर्ले या गावांसह पंचक्रोशीतील अनेक बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

न्यायालयाने बंदी घातल्याने गेली अनेक वर्ष बैलगाड्या शर्यती बंद होत्या. परंतु कोर्टाने ही बंदी हटवल्यानंतर घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यत सुरू झाली. त्यापाठोपाठ कोकणातही बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. मात्र, या शर्यती डोंगरमाळावर नाही तर समुद्र किनारपट्टीवर पार पडल्या. कोकणात समुद्र किनाऱ्यावर चक्क वाळूत या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे समुद्रकिनार्‍यावरील वाळूत बैलगाडीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.


Web Title: Thrill of Saldure beach bullock cart race in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.