काळ हेच उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:31 AM2021-05-10T04:31:23+5:302021-05-10T04:31:23+5:30
आज मात्र अठरा वर्षांच्या ‘अनघा’ या इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या माझ्या विद्यार्थिनीनेही तसाच प्रश्न व्हाॅट्सॲप ग्रुपवर विचारला. ‘‘सर, आमची बोर्डाची ...
आज मात्र अठरा वर्षांच्या ‘अनघा’ या इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या माझ्या विद्यार्थिनीनेही तसाच प्रश्न व्हाॅट्सॲप ग्रुपवर विचारला. ‘‘सर, आमची बोर्डाची एक्झाम होणार तर आहे ना’’ या वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे जरी माझ्यासारख्या शिक्षकाकडून अनुत्तरीत राहिली असली तरी येणारा काळच त्या प्रश्नांची उत्तरे देईल. पहिलीपासून ते बारावी इयत्तेपर्यंतच्या मुलांच्या मनात म्हणजे बालवयापासून ते किशोरवयीन मुलांच्या मनात असे शिक्षणविषयक अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आज कोरोनाच्या काळात शिक्षणाची सर्वच गणिते बदललेली आहेत. ‘गुरुकुल’ व्यवस्थेतील ‘पाठांतर पद्धत’ ही तर नाहीशी झाली आहे आहे. ऑनलाईन शिक्षण किंवा ऑनलाईन परीक्षा यांसारख्या नवीन शिक्षणातील माध्यमांचा वापर केला जाऊ लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ‘‘शिक्षण वाघिणीच्या दुधासारखे आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.’’ कोरोनामुळे शिक्षित माणूससुद्धा शांत झाला आहे. शिक्षण हे दुधारी तलवारीसारखे असले तरी कोरोनामुळे ती दुधारी तलवार बोथट तर झाली नाही ना, असा विचार माझ्या मनामध्ये येतो. परंतु या प्रश्नाला काळच उत्तर देईल.
बारावीच्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी एकच प्रश्न विचारून मन हैराण केले आहे. परीक्षा होईल काय, सीबीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेचे स्वरूपही स्पष्ट झाले. तसेच निकालाच्या तारखाही जाहीर झाल्या. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षाही रद्द झाल्या. त्यांच्या मूल्यमापनाचे काय, असाही प्रश्न निर्माण झाला. बारावीच्या परीक्षांचे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांचे शिक्षण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. कोरोनाने फक्त जगातील मनुष्यप्राण्यावरच नाही तर त्यांच्या शिक्षणप्रणालीवरही दूरगामी परिणाम केला आहे. आपली पुढील शैक्षणिक वाटचाल कशी असेल, त्याचे उत्तर येणारा काळच देईल.
- प्रा. हनुमंत लोखंडे, आडिवरे हायस्कूल, राजापूर