हिंदू नववर्ष स्वागतानिमित्त रत्नागिरीत शोभायात्रा
By मेहरून नाकाडे | Published: April 9, 2024 03:23 PM2024-04-09T15:23:27+5:302024-04-09T15:24:54+5:30
रत्नागिरी : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. यादिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून दारासमोर गुढी उभारली जाते. त्यानुसार शहरात तसेच ग्रामीण ...
रत्नागिरी : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. यादिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून दारासमोर गुढी उभारली जाते. त्यानुसार शहरात तसेच ग्रामीण भागात दारासमोर गुढी उभारण्यात आल्या होत्या. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात शोभायात्रा काढण्यात आली.
श्री भैरी मंदिर येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. तसेच दुसरी शोभायात्रा मारूतीमंदिर येथून काढण्यात आली. शोभायात्रेत विविध संस्थांनी सहभाग नोंदविला होता. रामायण, महाभारत तसेच देवदेतांचे याशिवाय सामाजिक संदेश देणारेही देखावेही या शोभायात्रेत सादर करण्यात आले होते. पारंपारिक वेशभूषेत नागरिकांनी सहभाग नोंदविला.
वाद्यवृंदाच्या तालावर, सामाजिक संदेश देत निघालेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत सहभागी नागरिकांना सरबत, खाऊचे वाटप विविध मंडळातर्फे करण्यात आले. पतिपावन मंदिर येथे शोभायात्रेची सांगता झाली.