आजपासून ५ शहरांत रणसंग्राम
By admin | Published: October 24, 2016 12:10 AM2016-10-24T00:10:49+5:302016-10-24T00:10:49+5:30
नगर परिषद निवडणूक : रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण, दापोलीत उमेदवारी अर्ज दाखल होणार
परतवाडा : अचलपूर शहरालगत रासेगाव रस्त्यावर असलेल्या कम्पोस्ट डेपोला रविवारी रात्री ८ वाजता भीषण आग लागली. घटनास्थळी दोन अग्निशमनने आग विझविण्याचे कार्य सुरू होते. ही आग भीषण असल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अचलपूर नगरपरिषदेचा कम्पोस्ट खत बनविण्याचा डेपो आहे. सदर कारखाना राजकीय हस्तक्षेपामुळे व दुर्लक्षामुळे अजूनपर्यंत सुरू झाला नाही. मात्र त्यासाठी हजारो टन कचरा शहरातून गोळा केलेला घनकचरा तेथे जमा करण्यात येत होता. त्याला मागील तीन ते चार दिवसांपासून आग लागल्याने काही प्रत्यक्षदर्र्शींचे म्हणणे आहे. नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
या आगीने रौद्ररुप धारण केले. आग विझविण्याचे कार्य रात्री उशिरा रात्रीपर्यंत सुरू होते.
या आगीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नगरपालिका कर्मचारी शेख मोहशीन यांचा निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. यावेळी निकेश दाभाडे, न.प. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. परंतु यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव व अप्रशिक्षित असल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)