रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी; जिल्ह्यात रेड अलर्ट

By अरुण आडिवरेकर | Published: July 26, 2023 08:53 AM2023-07-26T08:53:12+5:302023-07-26T08:53:30+5:30

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आज, दिनांक २६ जुलै रोजी 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.

Today is a holiday for schools in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी; जिल्ह्यात रेड अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी; जिल्ह्यात रेड अलर्ट

googlenewsNext

रत्नागिरी : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यत वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना आज, बुधवार, दि. २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सकाळी  ८ वाजता दिला.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आज, दिनांक २६ जुलै रोजी 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी आज, २६ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.

Web Title: Today is a holiday for schools in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.