पावस, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मुरूड पर्यटनस्थळे गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:21 PM2019-05-16T12:21:04+5:302019-05-16T12:23:36+5:30

उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने कोकणासह आता जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील पावस, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मुरूड आदी पर्यटनस्थळे आता पर्यटकांनी गजबजू लागली आहेत. निवासाच्या ठिकाणीच पर्यटकांचे मनोरंजन व्हावे, त्यांचा निवास लांबावा या हेतूने येथील पर्यटन विकास महामंडळातर्फे विविध कार्यक्रम सादर करण्यात येत असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी दिली.

The tourist, hill, Ganapatipule, Taraneshwar, Murud etc. are now tourists | पावस, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मुरूड पर्यटनस्थळे गजबजली

पावस, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मुरूड पर्यटनस्थळे गजबजली

googlenewsNext
ठळक मुद्देपावस, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मुरूड आदी पर्यटनस्थळे आता पर्यटकांनी गजबजलीपर्यटन विकास महामंडळ : पर्यटक निवासाठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाने मनोरंजन

रत्नागिरी : उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने कोकणासह आता जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील पावस, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मुरूड आदी पर्यटनस्थळे आता पर्यटकांनी गजबजू लागली आहेत. निवासाच्या ठिकाणीच पर्यटकांचे मनोरंजन व्हावे, त्यांचा निवास लांबावा या हेतूने येथील पर्यटन विकास महामंडळातर्फे विविध कार्यक्रम सादर करण्यात येत असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी दिली.

कोकणच्या निसर्गसौंदर्याचे पर्यटकांना आकर्षण आहे. विशेषत: समुद्रकिनाऱ्यांच्या ओढीने एक-दोन दिवसांसाठी विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. जिल्ह्यात सध्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. महाराष्ट्रातील पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एम. टी. डी. सी) माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. अनेक ठिकाणी तंबू निवासाद्वारे पर्यटकांना राहण्याची सोय करून दिली जात आहे.

कोकणातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या समुद्रकिनाऱ्यांकडे आकृष्ट होणाऱ्या राज्य, देश आणि परदेशी पर्यटकांनी काही काळ येथे वास्तव्य करावे, यादृष्टीने त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जलपर्यटन, जलक्रीडा यामधून पर्यटकांना आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा मुख्य हेतू आहे.

निवासासाठी पर्यटकांकडून पर्यटन विकास महामंडळाच्या निवासांना प्रथम पंसती दिली जात असल्याने गणपतीपुळे येथे कोकणातील वास्तव्याचा आनंद अनुभवता यावा, यासाठी तंबू निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटन महामंडळातर्फे याठिकाणी २६ बांबू निवास उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पर्यटकांचे निवासाच्या ठिकाणी मनोरंजन व्हावे यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक लोककलांचे सादरीकरण केले जात आहे. गणपतीपुळे येथे शनिवारी आणि रविवारी या कार्यक्रमांचा आनंद पर्यटकांनी घेतला. तसेच गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथेही पौर्णिमेला कलाकारांचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
 

Web Title: The tourist, hill, Ganapatipule, Taraneshwar, Murud etc. are now tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.