रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांचे पर्यटकांना महत्वाचे आवाहन, म्हणाले..

By शोभना कांबळे | Published: July 3, 2023 06:59 PM2023-07-03T18:59:08+5:302023-07-03T19:01:01+5:30

रत्नागिरी : पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांनी तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या परिजणांची काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही ...

Tourists should be careful, appeal of Ratnagiri Superintendent of Police to tourists | रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांचे पर्यटकांना महत्वाचे आवाहन, म्हणाले..

रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांचे पर्यटकांना महत्वाचे आवाहन, म्हणाले..

googlenewsNext

रत्नागिरी : पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांनी तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या परिजणांची काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही ठिकाणी नियम व शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिक व परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा व त्याठिकाणी असणारी पर्यटन स्थळे, अनेक धबधबे, पाण्याचे डोह, घाट व घाटांमध्ये असणारे अनेक सनसेट पॉईंट्स वर भेट देण्यासाठी अनेक पर्यटक व नागरिक जिल्ह्यात येतात. सध्या, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे व वादळी वाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. परिणामी घाटामधील धुक्याच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. तसेच काही दरड प्रवण क्षेत्रांमध्ये, दरड कोसळण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे. परिणामी वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे, असे पाेलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

घाटांमधून प्रवास करणाऱ्या अथवा निसर्गप्रेमी लोकांनी घाट माथ्यावर, अवजड वळणावर, सनसेट पॉईंट्स वर आपली वाहने उभी करून सेल्फी काढण्याकरिता थांबू नये. तसेच धुक्यामुळे होणारे अपघात टाळण्याकरिता आपल्या वाहनाचे फॉग लॅम्पचा व परावर्तकांचा योग्य वापर करावा. अतिवृष्टीमुळे घाटामधील असणारी जुनी व मोठी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाणही जास्त आहे. धाेकादायक झाडाखाली आपली वाहने उभी करु नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

धबधब्यावर जाऊ नये

रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या अनेक धबधब्यांमध्ये छोटे-मोठे दगड वाहून येत आहेत. तसेच धबधब्यांचा प्रवाहही जास्त प्रमाणांमध्ये आहे. त्यामुळे धबधब्यात उतरणारे लोक वाहून अथवा गंभीर इजा पोहाेचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी तेथे जाणे टाळावे.

माेह टाळा

पावसाच्या पाण्याने तयार झालेल्या डोहामध्ये खोलीचा अंदाज येत नाही. अशा ठिकाणी आपण तसेच लहान मुलांना घेऊन जाणे टाळावे. अतिवृष्टीमुळे समुद्रामध्ये, धरण, पाणलोट क्षेत्र, नदी व नाल्यांमध्ये (पऱ्यांमध्ये) पोहण्याचा व तेथे भेट देण्याचा मोह टाळावा व सुरक्षितता बाळगावी.

Web Title: Tourists should be careful, appeal of Ratnagiri Superintendent of Police to tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.